#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थिनी ,महिला अधिकारी व कर्मचारी यांना  स्वसंरक्षणाचे धडे व मार्गदर्शन

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी(खु.) येथे दि. १८/०१/२०१८ रोजी महाविद्यालयातील  अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनी, महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी “स्वसंरक्षण व प्रबोधन” हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमास  श्री. संतोष देव्हाडे (पोलीस नाईक) , श्रीमती तृप्ती गायकवाड (पोलीस  कॉन्स्टेबल), श्रीमती सारिका बनकर (पोलीस  कॉन्स्टेबल) आणि श्री विजय फरगडे (कराटे प्रशिक्षक)  हे पाहुणे म्हणून लाभलेत.
            कार्यक्रमाची सुरवात श्रीमती डॉ. के. व्ही. ठाकूर (अंतर्गत तक्रार निवारण समिती,अध्यक्ष) यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यानंतर कार्यक्रमात श्री विजय फरगडे व त्यांच्या टीमने  मुलींना स्वसंरक्षना करीता  कराटेचे प्रात्यक्षिक दाखविले व मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती तृप्ती गायकवाड व सारिका बनकर या महिला पोलीस कॉन्स्टेबल यांनी विद्यार्थिनी व महिला अधिकारी व कर्मचारी यांना खऱ्या घडलेल्या प्रसंगाची माहिती देत “निर्भया” पथक कशा पद्धतीने काम करते याची सविस्तर माहिती दिली. कार्याकार्माच्या शेवटी श्रीमती एच. एच. राक्षे (अंतर्गत तक्रार निवारण समिती,सदस्य ) यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. संजना जाधव आणि कु. प्रिया उंडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजनासाठी महिला तक्रार निवारण समिती सदस्य श्रीमती पी. आर. देशमुख यांची मदत झाली. कार्यक्रमाच्या आयोजनास महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉ.ए.एस्.पंत यांचे मार्गदर्शन लाभले.