#
News & Events

ऊर्जा संवर्धन व बचत ’ या विषयाचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने ऊर्जा दक्षता ब्युरो, भारत सरकार, विद्युत मंत्रालय यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे यांच्या सहयोगाने शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात दिनांक २४/०९/२०१८ रोजी वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. सदर वकृत्व स्पर्धेस विविध अभियांत्रिकी शाखेतील एकूण ३० वीधार्थ्यानी सहभाग नोंदवला. औद्योगीकरणासाठी इंधनाच्या अमर्याद वापरामुळे नजीकच्या काळातील संभाव्य ऊर्जासंकट देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील अडथळा आहे व तो दूर करण्यास ऊर्जा बचत, नविकरणीय ऊर्जास्त्रोतांचा वापर आणि त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज यावर विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण मते मांडली. विषयाची सखोल माहिती व उत्तम वकृत्व या निकषावर कु. विलास रवळनाथ गुरव, अंतिमवर्ष यंत्र अभियांत्रिकी व कुमारी. ज्योती प्रभाकर खाकरे, तृतीयवर्ष यंत्र अभियांत्रिकी या विद्यार्थ्याची विभागीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या वकृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ऊर्जा हि आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिलेली देणगी नसून आपल्या भावी पिढीसाठी दिलेले कर्ज आहे आणि ते भावी पिढीला परत करावयाचे आहे. ‘ ऊर्जा बचत ही ऊर्जा निर्मितीच आहे ’ हा मुलमंत्र डॉ. एस. व्ही. करमारे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ऊर्जा संवर्धन व बचत या करीता महाविध्यालय प्रयत्नशील आहे तसेच याबाबतीत समाजात जागरुकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे असे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी सांगितले . सदर वकृत्व स्पर्धा डॉ. एस. व्ही. करमारे, सहायक प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी व श्री. एन. डी. पडवळे, सहायक प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केली होती.