#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द येथे इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई) नवी दिल्ली स्टुडंट चापटर चे उद्घाटन दि.०१ सप्टेंबर २०१८ रोजी श्रीमती डॉ. नीलिमा अय्यर, वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमती डॉ.नीलिमा अय्यर यांनी विद्यार्थ्यांना “सायबर फिजीकल सिस्टीम “आणि “भारतातील सीएसआयआर प्रयोगशाळेत अभियंतांसाठी संधी” या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत, स्वयंचल विभागाचे विभागप्रमुख तथा आय.एस.टी.ई समन्वयक डॉ. दिलीप पानगव्हाणे व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. सदर उपक्रमाबाबत प्राचार्य डॉ. अविनाश पंत व स्वयंचल विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर आय.एस.टी.ई अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध योजना व कार्यक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ए.व्ही. कुलकर्णी यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजन आय.एस.टी.ई सहसमन्वयक श्री. अरविंद भोसले, श्री. धीरज लेंगरे व श्रीमती ए.व्ही. कुलकर्णी यांनी केले.