#
News & Events

अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरीचे खो खो स्पर्धेत यश

आंतरमहाविद्यालीन खो-खो (मुली) स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी येथील तृतीय क्रमांक  मुलींच्या संघाने  संपादन केला. एस. बी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालीन पुणे विद्यापीठ स्पर्धेत महाविद्यालयातील मुलींच्या संघाचे प्रतिनिधित्व प्रियंका अंकुश, काजल ठाणगे, दीप्ती लोंगे, प्रज्ञा गिरी, सरला आव्हाड, दिप्ती बोरावके, सुवर्णा नाडेकर, अंजली हांडे, गायत्री शेंडे, पालवी वाघ, स्नेहल पांचाल आदिती लाडगे यांनी केले, तसेच प्रियंका अंकुश येने विद्यापीठ विभागीय संघात स्थान मिळविले. महाविद्यालयीन संघाचे व्यवस्थापक  म्हणून कार्य श्री शिवले एस. के. यांनी केले. स्पर्धेत सहभागी विद्याध्याचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पंत यांनी केले. या यशात जिमखाना प्रमुख डॉ.एन.पी.फुटाणे, श्री.एस.डी.पाटील, श्री. थोरात एस.बी., श्रीमती.एस.बी.मोरडे यांचा सहभाग होता. आंबेगाव तालुका व परिसरातून सहभागी संघाचे कौतुक होत आहे