#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात MATLAB वरती दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात अणुविद्युत व दूरसंचार विभागामार्फत MATLAB वरती दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन अणुविद्युत व दूरसंचार विभागाचे विभागप्रमुख डॉ.मनोज एस.नागमोडे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, संशोधन ही काळाची गरज असून विद्यार्थांना त्यासंबंधी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या सारख्या कार्यशाळेतून ते साध्य होईल व त्यांच्या तांत्रिक क्षमतेत भर पडेल. या कार्यशाळेत द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्ष अभियांत्रिकीच्या एकूण ४५ विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. MATLAB वरती झालेल्या या कार्यशाळेमुळे मुलांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिकांमध्ये तसेच विविध विषयांवरील Project तयार करण्याकरिता फायदा होणार आहे. या कार्यशाळेकरिता श्री. राहुल महाडिक Assistant System Engineer,TCS,Pune हे तज्ञ लाभले. तसेच कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्रीमती कीर्ती ठाकूर यांनी काम पाहिले. MATLAB software installation च्या बाबत  तांत्रिक प्रयोग शाळा सहाय्यक  श्रीमती एस. बी. मोरडे व श्री एस. के. शिवले यांनी काम पाहिले. सदर कार्यशाळा घेण्याकरिता महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. ए.एस.पंत यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले तसेच कार्यशाळेत सहभागी झालेल्या विध्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले.