#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द येथे Advances in Robotics and AI विषयावर प्राध्यापकांसाठी कार्यशाळा

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) येथे दि. १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०१८ या कालावधी मध्ये अडव्हानसेस इन रोबोटिक्स अन्ड एआय (Advances in Robotics and AI) या विषयावर एक आठवड्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे या संस्थेचे अनुवीद्युत अभियांत्रिकी विभागाचे ,प्रा.ए.बी.पत्की यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाणे झाले . प्रथम कार्यशाळेचे समन्वयक डॉ एम .एस.नागमोडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व कार्यशाळेचे प्रयोजन सांगितले. या प्रसंगी कार्यक्रमास उपस्थित पाहुणे प्रा.ए.बी.पत्की म्हणाले की.”सध्याचे युग हे आर्टीफीशीयल इंटीजीलीअंस व रोबोटिक्स चे आहे. आपल्या वीध्यार्त्यानी शालेय जीवनातच (बारावी पर्यंतच) रोबोटिक्स खेळन्या बनवल्या पाहेजेत व पुढे अभियांत्रिकी शाखेत त्यांनी औद्योगिक रोबोट तयार केले पाहेजेत.”

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. एस. पंत म्हणाले की “विद्यार्थी हा समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. जर या विद्यार्थ्यांना पुढील काळात आर्टीफीशीयल इंटीजीलीअंस व रोबोटिक्स या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधी या विषयाचे ज्ञान अवगत करावयाचे असेल तर प्रथमत: प्राध्यापकांना सदरबाबत चे अद्यावत तंत्रञान देणे गरजेचे आहे. हि संधी लक्ष्यात घेऊन या ही कार्यशाळा आयोजित केली आहे.यावेळी त्यांनी रोबोटिक्स चा वापर औद्योगिक क्षेत्रात कसा वाढत चालला आहे याची उदाहरणे दिली. शासनाने याबाबतीत पुढील पावले उचलली पाहिजेत व शक्षणीक संस्थानी पण जबाबदारी उचलली पाहिजे असे नमूद केले.” सदर कार्यशाळा संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई यांनी मान्यता दिली असून सदर कार्यशाळेसाठी राज्यातील अनेक शासकीय व खाजगी अनुदानित अभियांत्रिकी तंत्रनिकेतन मधील प्राध्यापक उपस्थित आहेत.सदर कार्यशाळेत प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी नामांकित शिक्षण संस्थेतील व उद्योग क्षेत्रातील उच्च शिक्षित तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या समन्वयका चे काम डॉ एम .एस.नागमोडे , सहसमन्वयक म्हणून डॉ.एन.पी.फुटाणे व श्री जी. आर. फुले काम पाहत आहेत,व त्यांनी अनुक्रमे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.