#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा जल्लोषात संपन्न

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दि. १३/०१/२०१८ रोजी संपन्न झाला. मेळाव्याचे  उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांच्या हस्ते सरस्वती  पुजन व दीपप्रज्वलनाने झाले. माजी विद्याथी मेळावा समन्वयक डॉ. श्याम सोनवणे  यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.मेळाव्याकरिता विविध शाखांचे एकूण  २१०  विद्यार्थी उपस्थीत होते.
यावेळी डॉ. ए. एस. पंत यांनी महाविद्यालयाच्या अद्यापर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे  सादरीकरण केले. तसेच विद्याथ्यांनी विविध राष्ट्रीय तांत्रिक कार्यक्रमात रोबोकॉन, बहा, गोकार्त ,ट्रक्टर ,डीझाइन यामध्ये   विद्याथ्यांच्या  यशाबद्दल माहिती सांगीतली. डॉ. ए. एस. पंत म्हणाले की  “सद्यस्थितीत महाविद्यालायचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात  मोठ्या पदावर आहेत. यामुळे प्रत्येक माजी विद्याथ्याचे महाविद्यालयास सहकार्य राहील, त्यामुळे महाविद्यालयातील विद्याथ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच उद्योग व महाविद्यालयातील संवाद वाढेल
यानंतर सर्व विभागामध्ये विभागप्रमुखांनी विभागाच्या सद्य स्थितीचे सादरीकरण केले . तसेच आलेल्या प्रत्येक माजी विद्याथ्यानी  सद्य स्थितीत शिकत असलेल्या मुलांना विविध नोकरीच्या संधी बाबत  मार्गदर्शन केले. व यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

डॉ. ए. एस. पंत यांनी माजी विद्यार्थी  संघटना स्थापन करण्याबद्दल  चा ठराव आवजी मतदानाने घोषीत केला. डॉ. श्याम सोनवणे  यांनी माजी विद्यार्थी  संघटनेची कार्यकारणी खालील प्रमाणे  घोषित केली.
अध्यक्ष – मनोज भोजने
उपाध्यक्ष – राहुल चव्हाण
सचिव - डॉ. श्याम सोनवणे 
कोषाध्यक्ष – तेजस नरवडे ,सदस्य – जगदीश बायस, प्रियंका शिंदे , धीरज चोपडे, प्रतिक साबळे,  अमोल साठे, कल्पेश जगताप, ऋषिकेश क्षीरसागर

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माजी विद्याथ्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा  दिला. व  अतिशय जल्लोषात प्रथम माजी विद्यार्थी मेळावा  पार पडला.