#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात  “नव्या भारताचा संकल्प”

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) मध्ये  दि.०९ ऑगस्ट २०१७ रोजी भारत सरकारच्या “संकल्पातून सिद्धी” न्यू इंडिया मूवमेंट (२०१७-२०२२) अंतर्गत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांच्या मार्गदर्शनाखाली “नव्या भारताच्या संकल्पाची”  शपथ घेण्यात आली .        महाविद्यालयात सकाळी  १०.१५ वाजता, कार्यालयात, महाविद्यालयातील सर्व विभागामध्ये विदयार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी नव्या भारताच्या संकल्पाची शपथ घेतली.
“आपण सर्व मिळून संकल्प करूया,२०२२ पर्यंत नवीन भारत निर्माण करण्याचा
आपण सर्व मिळून संकल्प करूया, एक  स्वच्छ भारत बनण्याचा
आपण सर्व मिळून संकल्प करूया,गरिबीमुक्त भारताचा
आपण सर्व मिळून संकल्प करूया,भ्रष्टाचार मुक्त भारताचा
आपण सर्व मिळून संकल्प करूया,दहशतवाद मुक्त भारताचा
आपण सर्व मिळून संकल्प करूया, जातीयवाद  मुक्त भारताचा
आपण सर्व मिळून संकल्प करूया, जातमुक्त भारताचा
नव - भारत निर्माणच्या आपल्या या संकल्पाच्या सिद्धीसाठी आपण सर्वजण मनापासून आणी कुतीने झटूया ”
तसेच भारताच्या स्वातंत्र्याकरीता ज्यांनी झोकून दिले, बलिदान  दिले, आज भारत छोडो आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनी सर्वांनी त्यांना नमन केले व श्रद्धांजली वाहीली.  

या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. ए. एस. पंत म्हणाले की “आज भारतास स्वच्छता , गरिबी, भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयवाद या भेडसावणाऱ्या गंभीर समस्या आहेत.  या नव्या भारताच्या संकल्पातून सर्वाना सदरील समस्या मुक्ती करीता  प्रेरणा मिळेल , नव भारत निर्माण करण्याकरीता दिशा मिळेल , भारत सर्व स्तरावर आघाडीवर राहून महासत्ता बनेल व २०२२ पर्यत नवीन भारत निर्माण होईल . ”

  या कार्यक्रमात सर्व विदयार्थी, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.