कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘झेस्ट २०’ या क्रीडा महोत्सवात शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द च्या मुलींच्या संघाने बाजी मारली. दि.२६/१/२०२० ला झालेल्या चुरशीच्या लढतीत पहिल्यांदा विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉंजी (व्हीआयटी) पुणे नंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) या दोन संघांसोबत चुरशीची लढत झाली.
उपांत्य फेरी सामन्यात व्हीआयटी संघाला १ डाव व ५ गुणांच्या फरकाने हरवत अंतिम सामन्यात धडक मारली. अंतिम सामन्यात क्रीडा महोत्सवाचे आयोजन कर्ते अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) च्या संघाला १ डाव व ४ गुणांच्या फरकाने नमवीत एकतर्फी सामना जिंकत दिमाखात विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द च्या संघाने तीन वेळेस सलग ही स्पर्धा जिंकत हॅटट्रिक करण्याचा बहुमान मिळवला .
स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रणाली वाघ आणि उत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून प्रांजल बारवकर यांचा सन्मान करण्यात आला. संघामध्ये महाविद्यालयातील प्रणाली वाघ(कर्णधार), प्रांजल बारवकर (उपकर्णधार),नीलम भोर,मानसी मोकल,आदिती लाळगे, सरला आव्हाड, निकिता कुंभार, प्राजक्ता पाटील, मयुरी स्वामी, ऐश्वर्या चेमटे, नेहा चक्कर, प्रतीक्षा लाळगे या खेळाडूंचा समावेश होता. विजेत्या संघाला गणेश जाधव (क्रीडा प्रतिनिधी), सौरभ बेर्डे व शैलेश शिंदे यांचे प्रशिक्षण लाभले.
विजेत्या संघाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत जिमखाना विभागप्रमुख डॉ.एन.पी.फुटाणे, क्रीडाप्रमुख श्री.एस.डी.पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तसेच जिमखाना कर्मचारी श्रीमती उबाळे व श्रीमती मोरडे यांचे सहकार्य लाभले. संघाने मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. .
- महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत जिमखाना विभागप्रमुख डॉ.एन.पी.फुटाणे, क्रीडाप्रमुख श्री.एस.डी.पाटील यांच्या सोबत विजिता संघ
- शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द चा विजेता संघ विजेतेपद स्वीकारताना
- स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रणाली वाघ आणि उत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून प्रांजल बारवकर यांचा सन्मान करण्यात आला.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: