दिनांक २१ जून २०१९ रोजी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). येथे पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने पार पडला. सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी श्री.गणेश माळी, (विभागीय अधिकारी, सहजयोग भारत, राजगुरू नगर, पुणे) हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा .एस.व्ही. जोशी यांनी भुषविले याप्रसंगी त्यांनी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रा .एस.व्ही . जोशी यांनी मान्यवरांना पुस्तक भेट देऊन सत्कार केला. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयातील विद्यार्थीनी कुमारी दीप्ती पवार हिने केली. श्री.गणेश माळी, यांनी सुरवातीला ‘योगाचे महत्व’ या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच त्यांनी ध्यानधारणा चे महत्व समजावले. सर्व उपस्थितांनी योग प्रात्यक्षिके उत्साहाने केली. सदरील कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे नियोजन डॉ.एन.पी.फुटाणे, प्र.जिमखाना अधिकारी,तसेच श्री. एस.डी.पाटील,सहा. प्राध्यापक स्वयंचल अभि.,श्रीमती एस.बी.मोरडे, तांत्रिक प्रयो. सहाय्यक, अणुविद्युत विभाग यांनी केले. व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयातील विद्यार्थीनी कुमारी स्नेहा यादव हिने केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: