अवसरी (खुर्द) : शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द ) येथे दि.२५ जानेवारी २०२१ हा “राष्ट्रीय मतदार दिवस” उत्साहात साजरा झाला. त्यानुसार १८ वर्ष पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व मतदार यादीत सहभाग वाढविणे हा यामागे प्रमुख उद्देश होता,
राष्ट्रीय मतदार दिवशी लोकशाही वर निष्ठा ठेवण्याची शपथ मतदारांना दिली जाते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी महविद्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना सकाळी १०.३० वाजता खालील प्रमाणे शपथ दिली “आम्ही,भारताचे नागरिक,लोकशाहीवर निष्ठा ढेवून,याद्वारे प्रतिज्ञा करतोकी, आपल्या देशाच्या लोकशाही परंपराचे जतन करू आणी मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्यक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश ,जात ,समाज ,भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.”
करोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेऊन तसेच सर्व नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेतील विभागप्रमुख ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: