शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे दि.३०/९/२०१९ रोजी महाविद्यालयात शाश्वत विकासाकरिता बांबू,अर्जुन सताडी, भेहडा ई, समाज उपयोगी वृक्षांची लागवड करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.महेंद्र घागरे (हरित मित्र परिवार संस्थापक पुणे) व मा. श्री.दिलीप घोलप सहसंचालक (सामाजिक वनीकरण विभाग, पुणे) यांच्या हस्ते झाले.सदर कार्यक्रमास मा. श्री ए.जे.बुरसे (वनक्षेत्रपाल सामाजिकवनीकरण विभाग, खेड) व श्री बी. डी.ईथापे (वनपाल ) वन अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. प्राचार्य डॉ. ए.एस.पंत म्हणाले की, आपला महाविद्यालयीन परिसर हिरवाईने नटला पाहिजे त्याकरिता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. श्री.बुरसे यांनी शासनाच्या ग्रीन आर्मी मध्ये प्राध्यापक व विद्यार्थी यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री.दिलीप घोलप म्हणाले की, बांबू हे झाड पर्यावरण तसेच समाज उपयोगी आहे व त्याची लागवड आपण मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे.डॉ.महेंद्र घागरे (हरित मित्र परिवार, पुणे संस्थापक) यांनी महाविद्यालयात बांबू लागवड करिता रोपे दिली व त्यांनी विद्यार्थांना पर्यावरण रक्षणासाठी मोलाचे मार्गदर्शन केले .
सदरील कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री.एन.एम.काराजंगी यांनी काम पहिले . प्रा.एम.जी.शेख, श्री.डी.एस.लेंगरे, श्री.आर.पी.काकडे व ग्रीन क्लब मधील विद्यार्थांच्या यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग होता.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: