शासकीय आभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे विज्ञान दिनानिमित्त शारदा शक्ती (NGO) पश्चिम महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७/०२/२०२४ (शनिवार) रोजी पोस्टर स्पर्धा व १/२ दिवसाची "शाश्वत भविष्यासाठी विज्ञान" या विषयावर विद्यार्थ्यांसाठी "घन कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती" बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात आले. सहभागींमध्ये, प्रद्युम्न पवळे आणि साक्षी कुशवाह यांसारख्या तरुण मनांनी, त्यांच्या मिनीसॅट प्रकल्पासाठी पोस्टर स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले.
श्री. अजित गाडगीळ (CEO & Founder, GD Environmental Pvt. Ltd.) यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. डॉ. मनीषा खळदकर (सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. लता एखंडे (सहाय्यक प्राध्यापक, पदार्थविज्ञान) यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नोकरीवर अवलंबून न राहता आपापल्या गावामध्ये स्थानिक उपयुक्ततेचा व्यवसाय उभा करावा व त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन श्री. अजित गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्पेर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास एकूण १०० विद्यार्थी उपस्थित होते. शारदा शक्ती यांच्या तर्फे डॉ. प्रियंवदा हेर्लेकर (स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ), डॉ. मृदुल शिरगुरकर (NCL शास्रज्ञ), डॉ. ललिता गौरी डांगे (Principal Aided School) या उपस्थित होत्या. डॉ. प्रियंवदा हेर्लेकर यांनी आभार प्रदर्शन केले. पोस्टर स्पर्धेमध्ये एकूण २४ गटांनी सहभाग घेतला. डॉ. एस.एस. देशपांडे, श्रीमती एच. के. मुनोत, डॉ. लता एखंडे, डॉ. प्रियंवदा हेर्लेकर, डॉ. मृदुल शिरगुरकर, डॉ.ललिता गौरी डांगे, श्रीमती एच. एच. राक्षे, डॉ. एम. डी पांचाळ यांनी पोस्टर परीक्षणाचे काम पाहिले. विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांक प्रद्युम्न पवळे (Minisat), द्वितीय क्रमांक आयुष पटांगळे (Edible Plastic Films: The Future of Packaging Technology), तृतीय क्रमांक विभांशु हिरे(Ionic Propulsion), उत्तेजनार्थ-१ प्रसाद बागले (Indigenous Asphale Technology), उत्तेजनार्थ-२ अथांग लोणकर (INS Vikrant), उत्तेजनार्थ-३ वेदांत जंगम (Indigenous Wisdom meets Robotics). डॉ. वाय. एन. चौधरी, श्री. विशाल जाधव, श्री. एस. डी. वणवे, श्री. बी. जे. बडे यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य लाभले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: