अवसरी : शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए.एस.पंत दि.३१ जुलै २०२१ रोजी सेवा निवृत्त झाले. महाविद्यालया तर्फे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
डॉ ए .एस पंत हे शासकीय सेवेत वर्ष १९८२ रोजी रुजू झाले होते .त्यांनी सलग ३९ वर्षाच्या कालावधीत विविध महत्वाच्या पदावर कामगिरी बजावली. ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड यथे ८ वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होते . अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद (AICTE) मध्ये त्यांनी उपाध्यक्ष (Vice Chairman) म्हणून तीन वर्ष सात महिने काम पहिले ,व महत्व पूर्ण कामगिरी बजावली. शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून पाच वर्ष कार्यभार सांभाळला. डॉ ए .एस .पंत यांना यांना दि.५ सप्टेंबर २०१२ रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराने महाराष्ट्र शासनाद्वारे सन्मानित करण्यात आले होते .
सदरील सेवा निवृती कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख , प्रा. एस. व्ही. जोशी , डॉ. डी. आर. पानगव्हाणे, डॉ. एस. यु. घुमरे, डॉ. डब्लु. एम. देऊळकर, डॉ. एन.एस.नेहे , डॉ. एम.एस. नागमोडे, डॉ यु. एस. काकडे, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते . प्रा. एस. व्ही. जोशी यांनी महाविद्यालयातर्फे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले, तर डॉ डी.आर.पानगव्हाणे यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार केला . श्रीमती एम. बी. जाधव यांनी श्रीमती मुर्णाल पंत यांचे स्वागत केले .डॉ. डब्लु. एम. देऊळकर (विभाग प्रमुख स्थापत्य ) यांनी प्राचार्य विदयार्थी प्रिय कसे होते याबाबत मनोगत व्यक्त केले .श्री आर.बी.कवळे (वरीस्ट लीपीक) यांनी शासकीय नियमानुसार कार्यालयीन कामकाज कसे करावे याबाबत प्राचार्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असे सांगितले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमास उपस्थित असलेल्या हर्षवर्धन लोखंडे व मधुकर गवनी यांनी प्राचार्यांनी रोबोकॉन,ई यंत्र,हॅकॅथॉन,गोकार्टिंग,बहा,झेस्ट ई अनेक स्पर्धा मध्ये प्रोत्साहन दिल्यामुळे यश संपादित झाले असे सांगितले. प्रा. एस. व्ही. जोशी यांनी डॉ ए .एस पंत यांचे कार्य नमूद करून ते एक उमदे व्यक्तीमत्व होते असे सांगितले . डॉ डी.व्ही. जाधव सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे यांनी दूरध्वनी द्वारे डॉ ए.एस.पंत यांना पुढील आयुष्या करीता शुभेच्छा दिल्या तसेच यापुढे ही तंत्रशिक्षण विभागास त्यांचे मार्गदर्शन लाभेल असे नमूद केले.सार्वजनिक बांधकाम पुणे विभागातर्फे डॉ ए .एस पंत यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ ए.एस.पंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की “ नियतवयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालो. जवळपास 39 वर्ष एक शिक्षक (प्राधान्याने) व प्रशासक या नात्याने प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाड़ण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान विद्यार्थी , सर्व वरिष्ठ, सहकारी व मित्रांचे अपार प्रेम व सहकार्य लाभले. त्यामुळेच हा दीर्घ प्रवास सुखकर व आनंदी गेला.या प्रवासातील,जवळपास ५ वर्षांचा शेवटचा टप्पा, अवसरीं च्या नयनरम्य परिसरात, व आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याने , निश्चितच अविस्मरणीय होता.” यावेळी त्यांनी प्राचार्य तसेच अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद (AICTE) मध्ये उपाध्यक्ष पदावरील त्यांचे अनुभव सांगितले ,महाविद्यालयास यापुढेही गरज भासल्यास मार्गदर्शन करेल अशी ग्वाही त्यानी यावेळी दिली .
तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र यांच्या मार्फत डॉ.ए.एस पंत यांच्याकडून प्रा.एस.व्ही. जोशी यांना प्राचार्य पदाचा कार्यभार हस्तांतर करण्यात आला आहे. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.ए.ग्याले (प्रोग्रामर) यांनी केले .आभारप्रदर्शन श्री सी .ए. सूर्यवंशी (प्रबंधक) यांनी केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: