अवसरी: महाराष्ट्र राज्यात करोना रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढल्यामुळे ऑक्सिजन च्या मागणीत मोठी वाढ झाली. ऑक्सिजनची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे व काही ठिकाणी गळती समस्या निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने सर्व कोवीड हॉस्पिटल च्या ऑक्सिजन ऑडिटचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील शहरी/निमशहरी/छावणी परिषद /तालुका स्तर /ग्रामीण मधील सर्व कोविड हॉस्पिटल चे ऑक्सिजन ऑडिट अतिरिक्त जिल्हा अधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या नियंत्रणा खाली पुणे जिल्ह्यातील तंत्र शिक्षण संस्थामार्फत २२५ प्राध्यापकांनी यशस्वी रित्या पूर्ण केले आहे. .
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील यंत्र,स्वयंचल व उपकरणीकरण अभियांत्रीकी विभागातील एकून १६ प्राध्यापकांचा ऑक्सिजन ऑडिट टीम मध्ये सहभाग होता, डॉ एस.एस.देशपांडे ,श्री ए.एस.कौशल ,श्री जे.एम.अरकल .श्री एन.डी.पडवळे ,डॉ मिलिंद बोनगुलवार,डॉ के.एच.कौडकी,डॉ एस. व्ही.करमारे,डॉ एस. व्ही. क्षीरसागर,श्री ए.जे.भोसले, श्री आर.पी.काकडे, श्री.एस.डी.पाटील,श्री डी.एस.लेंगरे,श्री एस .आर. पाटील,श्री.एन.एम.काराजंगी,डॉ एम. जे. पाबळे ,श्री व्ही. वाय. ढेपे यांनी जुन्नर, खेड आणी पुरंदर तालुक्यातील सर्व कोविड हॉस्पिटल चे ऑक्सिजन ऑडिट यशस्वी रीत्या पूर्ण केले
ऑक्सिजन ऑडिट तपासणी मध्ये रूग्णांना आवश्यक तेवढाच ऑक्सिजन पुरवठा व योग्य उपयोग होतो की नाही याबाबत तपासणी करणे ,ऑक्सिजन टेंक पासून ते पाइप लाईन व प्रत्यक्ष वार्डात ऑक्सिजन वहन करणाऱ्या उपकरणा मधील गळती /दुरुस्ती बाबत तपासणी , ऑक्सिजन प्लांट जवळ कुठल्या ही प्रकारची ज्वलनशील वस्तू नाही याची पडताळणी करणे जेणे करून धोका टाळता येईल, पाईप लाईन मधील भेगा व त्या मधून होणारी गळती शोधण्यासाठी सोनार सीस्टीम चा वापर रुग्णालये करत आहेत की नाही याची खात्री करणे , ऑक्सिजन चा वापर अत्यंत काटकसरीने हॉस्पिटल मध्ये होतो का नाही उदा: रुग्ण बाथरूमला गेल्या नंतर व रुग्ण जेवण करताना ऑक्सिजन बंद करणे बाबत तसेच अनेक वेळा रात्री रुग्ण ऑक्सिजनचे मशीन बाजूला काढून झोपतात .तसेच फारशी गरज नसलेल्या रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरूच ठेवणे अशा सर्व बाबींची तपासणी करण्यात आली.
सदरील ऑडिट मुळे मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजन ची बचत होत आहे व होणारे संभाव्य धोके टाळले जात आहेत. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री यांनी तंत्र शिक्षण संचालनालय व संस्थांनी केलेल्या कामाची प्रशंसा व केली आहे. सध्याच्या कोविड साथरोगाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात सर्व संस्थाप्रमुख/प्राचार्य आणि त्यांच्या चमूने एक अत्यंत प्रेरणादायी व प्रशंसनीय काम केल्याबद्दल डॉ .अभय वाघ (संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई) यांनी सर्वांचे व आपल्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी ऑक्सिजन ऑडिट मध्ये महाविद्यालयातील सहभागी झालेल्या प्राध्यापकांनी अत्यंत कठीण परिस्थितीत ऑक्सिजन ऑडिट यशस्वी पूर्ण केल्यामूळे त्यांचे अभिनंदन केले आहे .
- ऑक्सिजन टेंक पासून ते पाइप लाईन व प्रत्यक्ष वार्डात ऑक्सिजन वहन करणाऱ्या उपकरणा मधील गळती दुरुस्ती बाबत तपासणी
- ऑक्सिजन वहन करणाऱ्या उपकरणा मधील गळती दुरुस्ती बाबत तपासणी
- ऑक्सिजन स्टअरेज बाबत तपासणी
- ऑक्सिजन विभागणी कक्षा ची पहानी
- ऑक्सिजन चा वापर अत्यंत काटकसरीने हॉस्पिटल मध्ये होतो का नाही या बाबत तपासणी
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: