Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून दिनांक १५ फेब्रुवारी, २०२४ रोजी महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली येथील प्रतिथयश संस्था “निर्माण: युथ फॉर पर्पजफुल लाईफ” चे संचालक आणि “सर्च” या संस्थेचे सह-संचालक श्री. अमृत बंग यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

“निर्माण: युथ फॉर पर्पजफुल लाईफ” हा पद्मश्री डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी सुरु केलेल्या “SEARCH”, गडचिरोली या संस्थेचा युवा विकास उपक्रम आहे. सन २००६ मध्ये स्थापन झाल्यापासून भारतातील २१ विविध राज्यांतील हजारो तरुणांनी ‘निर्माण’ प्रक्रियेत भाग घेतला आहे. ‘निर्माण’ विविध सामाजिक समस्यांबद्दल तरुणांना संवेदनशील बनवण्याचे काम करते आणि त्याच वेळी या तरुणांच्या भरभराटीला हातभार लावते. ‘निर्माण’ प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘कॉलेज कनेक्ट’ जिथे ‘निर्माण’ टीमचे सदस्य विविध राज्यांमधील विविध महाविद्यालयातील वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्यांना, ‘निर्माण पुढाकाराबद्दल, उत्कर्षाच्या जीवनासाठी आवश्यक फ्रेमवर्क आणि इनपुट, उद्देशपूर्ण जीवनाचा पाठपुरावा करणाऱ्या तरुणांची उदाहरणे, ‘निर्माण’ कार्यशाळा, ‘निर्माण’ यांनी उपलब्ध केलेली विविध शैक्षणिक संसाधने’, याबाबत सविस्तर माहिती देतात. .

या कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन, रोपट्यांना जलार्पण, सरस्वती पूजन, राष्ट्रीय सेवा योजना गीत व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अमृत बंग, त्यांच्या ‘निर्माण’ मधील सहकारी मा. श्रीमती अदिती परुळेकर, आणि विशेष अतिथी म्हणून गेटवेल हॉस्पिटल, मंचरचे संचालक डॉ. मोहन साळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांनी सर्वांचे स्वागत व राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबविले जाणारे विविध उपक्रम व वाटचाल यांची माहिती उपस्थितांना करून देऊन केले.

त्यानंतर, महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांनी सर्वांचे स्वागत करून “महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यक्रमांच्या नियमित आयोजनाचे महत्व विषद केले व मा. श्री. अमृत बंग, त्यांच्या ‘निर्माण’ मधील सहकारी मा. श्रीमती अदिती परुळेकर, आणि विशेष अतिथी म्हणून गेटवेल हॉस्पिटल, मंचरचे संचालक डॉ. मोहन साळी यांनी महाविद्यालयाचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रम व महाविद्यालयाची एकूणच वाटचाल याबद्दल उपस्थितांना माहिती करून दिली”.

यापुढे बोलताना, त्यांनी निर्माण हि संस्था का तयार झाली, कश्या पद्धतीने तरुण त्यांच्या सोबत आणि 'निर्माण' सोबत जोडले गेले तसेच ‘निर्माण’ या संस्थेने अनेक युवकांच्या जीवनात काय बदल घडवून आणले व त्यांना हेतुपूर्ण जीवन जगण्यास कशी मदत केली, तसेच पदवीधर होऊन झालेल्या ज्ञानप्राप्तीच्या बळावर विद्यार्थ्यांनी ‘निर्माण’ च्या सहयोगाने ग्रामीण भागामध्ये केलेल्या विकासकामांबद्दल विस्तृत माहीती दिली. पुढे त्यांनी, एखादा तरुण जो पदवीधर आहे पण त्याला त्याच्या ज्ञानाचा उपयोग विकसीत असलेला देश किंवा इतर ठिकाणी करायचा नाही तर अविकसीत ग्रामीण भाग जिथे सोई-सुविधांचा अभाव आहे तेथे करावयाचा आहे, हा दृष्टीकोणच अशा तरुणांना कसा इतरांपेक्षा वेगळा बनवतो आणि सामाजीक कार्याशी त्यांची सांगड घालतो, याची जाणीव करून दिली. तसेच अशाप्रकारे समाजसेवा आणि उच्चशिक्षीत तरूणाई यांचा मेळ झालेल्या कित्येक तरुणांची उदाहरणे दिली व ‘निर्माण’ आपल्या विविध शिबिरांमधून अशा तरुणांना योग्य दिशा दाखवून कशी मदत करते हेदेखील सांगितले.यापुढे बोलताना, त्यांनी निर्माण हि संस्था का तयार झाली, कश्या पद्धतीने तरुण त्यांच्या सोबत आणि 'निर्माण' सोबत जोडले गेले तसेच ‘निर्माण’ या संस्थेने अनेक युवकांच्या जीवनात काय बदल घडवून आणले व त्यांना हेतुपूर्ण जीवन जगण्यास कशी मदत केली, तसेच पदवीधर होऊन झालेल्या ज्ञानप्राप्तीच्या बळावर विद्यार्थ्यांनी ‘निर्माण’ च्या सहयोगाने ग्रामीण भागामध्ये केलेल्या विकासकामांबद्दल विस्तृत माहीती दिली. पुढे त्यांनी, एखादा तरुण जो पदवीधर आहे पण त्याला त्याच्या ज्ञानाचा उपयोग विकसीत असलेला देश किंवा इतर ठिकाणी करायचा नाही तर अविकसीत ग्रामीण भाग जिथे सोई-सुविधांचा अभाव आहे तेथे करावयाचा आहे, हा दृष्टीकोणच अशा तरुणांना कसा इतरांपेक्षा वेगळा बनवतो आणि सामाजीक कार्याशी त्यांची सांगड घालतो, याची जाणीव करून दिली. तसेच अशाप्रकारे समाजसेवा आणि उच्चशिक्षीत तरूणाई यांचा मेळ झालेल्या कित्येक तरुणांची उदाहरणे दिली व ‘निर्माण’ आपल्या विविध शिबिरांमधून अशा तरुणांना योग्य दिशा दाखवून कशी मदत करते हेदेखील सांगितले.

श्री. अमृत बंग यांच्यासह आलेल्या त्यांच्या सहकारी आणि कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख अतिथी श्रीमती अदिती परुळेकर यांनी विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ या विषयावर भाष्य करताना, “भावना व्यक्त करणे आजच्या तरुणांसाठी किती महत्वाचे आहे याबद्दल तसेच मानसीक आरोग्य संतुलन याबद्दल मार्गदर्शन केले”.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो विद्यार्थी अनिकेत गायकवाड आणि रेणुका जाधव यांनी केले, प्रमुख पाहुण्यानांचा परिचय ऐश्वर्या कोतकर हिने केला तर आभार प्रदर्शन अभिलाष शिंदे याने मानले तर आयोजन महाविद्यालयातील रासेयो विद्यार्थी समन्वयक हर्षल बरडे, श्रुती काळे व सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी केले. याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापाकेत्तर कर्मचारी आणी विद्यार्थी उपस्थीत होते.