Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थी कु. हर्षल विठ्ठल बर्डे, तृतीय वर्ष, स्थापत्य अभियांत्रिकी याने दि. २७ मार्च, २०२४ ते ३१ मार्च, २०२४ या दरम्यान चिखलदरा, जि. अमरावती येथे पार पडलेल्या “राज्यस्तरीय साहसी शिबिर-२०२३-२४” मध्ये सहभाग नोंदविला.

National Adventure Foundation Amaravati Chapter, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आणि राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरावरील साहसी शिबीर दि. २७ मार्च, २०२४ ते ३१ मार्च, २०२४ या दरम्यान चिखलदरा, जि. अमरावती येथे पार पडले. या राज्यस्तरीय शिबिरासाठी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) या महाविद्यालयातील विद्यार्थी कु. हर्षल विठ्ठल बर्डे याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून निवड करण्यात आली होती.

या शिबिरासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून विविध महाविद्यालयामधून ०६ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा संघ पाठवण्यात आला होता. या शिबिरामध्ये राज्यभरातील एकूण ११० स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना Mountaineering, त्यासाठी आवश्यक साहित्य आणि Mountaineering साठी विविध प्रकारच्या Knots कशा बांधायच्या याची व चिखलदरा येथील जैवविविधतेची माहिती दिली. तसेच Rapling, Bamboo Bridge Crossing, Trekking यांचीही प्रात्याक्षिके देण्यात आली.

या ०७ दिवसांच्या शिबिरामध्ये दररोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांचा स्वयंसेवकांनी आपल्या जिल्ह्याच्या संस्कृतीचे दिलेल्या थीमच्या आधारे वैशिष्ठे मांडली ज्यातून सहभागी स्वयंसेवकांना विविध जिल्ह्यांच्या संस्कृती समजून घेता आली, तसेच आपल्या जिल्ह्याची संस्कृती राज्य पातळीवर सादर करण्याची संधीदेखील मिळाली. या शिबिरामधील सांस्कृतिक कार्यक्रमात कु. हर्षल बर्डे याने स्वतः ‘वासुदेवा’ची भूमिका साकारून महाराष्ट्रातून ऱ्हास होत चाललेल्या अत्यंत महत्वाच्या घटकाबद्दल उद्बोधन करून आपला सहभाग नोंदवला. दि. २९ मार्च या दिवशी सर्व विद्यार्थ्यांसाठी Star Gazing चे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान विद्यार्थ्यांना विविध ताऱ्यांची माहिती करवून देण्यात आली तसेच ताऱ्यांच्या नावाने सुरु असलेल्या अंधश्रद्धेच्या निर्मूलनाचे कार्य करण्यात आले.

सदर शिबिरात सहभागी होण्यासाठी त्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय, पुणे चे संचालक डॉ. अजय शिंदे, प्र. कुलसचिव डॉ. विजय खरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सदानंद भोसले, जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकांत फुलसुंदर, संघप्रमुख या विद्यार्थ्यांसह गेलेले प्रा. डॉ. ज्योती माने आणि प्रा. डॉ. पोपट शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले.

सदर विद्यार्थ्यास हे यश संपादन करण्यासाठी महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ, श्रीमती दीपा माहेश्वरी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. वासुदेव देऊळकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन प्राप्त झाले.