Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

दि. २० व २१ ऑगस्ट, २०२४ रोजी “शाश्वत विकासासाठी उर्जा आणि पर्यावरण - २०२४” या विषयावर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या वाणी या योजनेअंतर्गत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे करण्यात येत आहे. सदर परिषदेचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयातील कवयित्री शांता शेळके सभागृह येथे व तदनंतरची पुढील सत्रे यंत्र अभियांत्रिकी विभागातील सेमिनार हाॅल, येथे संपन्न होणार आहेत.

व्हायब्रंट एॅडव्होकसी फॉर एॅडव्हान्समेंट अँड नर्चरिंग ऑफ इंडियन लँग्वेजेस (वाणी) या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत योजनेचा एक महत्वाचा भाग म्हणून शाश्वत विकासासाठी उर्जा आणि पर्यावरण - २०२४ ही द्वितीय राष्ट्रीय परिषद मराठी भाषेतून आयोजित केली जात आहे. ही परिषद प्राध्यापक , विद्यार्थी आणि उद्योग व्यावसायिकांना अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि संशोधन प्रदर्शित करण्यासाठी एक संधी आणि व्यासपीठ प्रदान करेल. सदर परिषद ही अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (AICTE) – व्हायब्रंट एॅडव्होकसी फॉर एॅडव्हान्समेंट अँड नर्चरिंग ऑफ इंडियन लँग्वेजेस (VAANI) या योजने अंतर्गत प्रायोजित करण्यात येत असल्याने या परिषदेत शोध निबंध प्रकाशित करणे तसेच सहभाग घेणे पूर्णतः विनामुल्य आहे ते.

सदर परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेंद्र काकडे - सल्लागार, अ.भा.तं.शि.प., नवी दिल्ली, विशेष अतिथी म्हणून डॉ. पराग काळकर - प्र. कुलगुरू, सा.फु. पु. वि., पुणे आणि विशेष तांत्रिक सत्राचे प्रमुख म्हणून सी-ग्रीन या संस्थेचे व्यस्थापकीय संचालक डॉ. नितांत माटे हे उपस्थित राहणार आहेत. सदर परिषदेत ०१ विशेष तांत्रिक सत्र, ०५ मुख्य तांत्रिक सत्रे व संशोधकांची शोधनिबंध सादर करण्यासाठी ०५ सत्रे अशी एकूण ११ सत्रे असणार आहेत. या परिषदेत सुमारे ३० शोध निबंध सादर होणार आहेत.

या परिषदेत जास्तीत जास्त संशोधक विद्यार्थ्यांनी, संशोधन करणाऱ्या शिक्षकांनी व उद्योगतज्ञानी हजर राहून मराठी भाषेमध्ये नवीन संकल्पना सादर कराव्यात व नवसंशोधन मराठी भाषेतून विकसित करण्यास प्रयत्न करावा असे आवाहन सदर परिषदेचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, निमंत्रक डॉ. शरद क्षीरसागर, संघटन सचिव डॉ. चंद्रशेखर सेवतकर यांच्यातर्फे करण्यात येत आहे.े.