Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

अवसरी खुर्द - शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथील उपकरणीकरण व नियंत्रण अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. मिलिंद रा. बोनगुलवार यांना सन २०२४-२५ या वर्षीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत “गुणवंत अध्यापक पुरस्कार” प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७६ व्या वर्धापन दिनी दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी कुलगुरू मा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते आणि प्र. कुलगुरू मा. डॉ. पराग काळकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि रोख ३१००/- रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सदर पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत उपकरणीकरण व नियंत्रण अभियांत्रिकी विषयाचे पूर्ण वेळ अध्यापन करणाऱ्या अध्यापकास दिला जातो. सदर पुरस्काराकरिता निवडीसाठी प्रामुख्याने अध्यापकाची मागील तीन वर्षातील कामगिरी, संशोधनात्मक लेख, शोधनिबंध, प्रयोगशाळेतील विकासात्मक कार्य, व्याख्यान कौशल्य, समाजोपयोगी रचनात्मक कार्यात सहभाग, विद्यार्थी व सहकारी यांच्या बरोबरचे संबंध, सेवानिष्ठा, अखिल भारतीय स्तरावरील संस्थाचे सभासदत्व व त्यांच्या कार्यातील सहभाग तसेच इतर विधायक बाबी या निकषांचा विचार केला करून उच्च पदवी प्राप्त व उपकरणीकरण व नियंत्रण अभियांत्रिकी क्षेत्राच्या विकासात लक्षणीय सहभाग असलेल्या अध्यापाकास हा पुरस्कार प्रदान केला जातो.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा. आमदार दिलीपरावजी वळसे-पाटील, महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक मा. डॉ. विनोद मोहितकर, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे चे सहसंचालक मा. डॉ. दत्तात्रय जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. दिलीप पानगव्हाणे, उपकरणीकरण विभागाचे विभाग प्रमुख मा. डॉ. नवनाथ नेहे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी डॉ. मिलिंद बोनगुलवार यांचे सन २०२४-२५ या वर्षीचा “गुणवंत अध्यापक पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या पूढील कार्यास शुभेछ्या दिल्या आहेत.