दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ (मंगळवार) रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त "राष्ट्रीय एकता दिवस” साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. यानंतर लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून तसेच भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त “राष्ट्रीय संकल्प दिवस” म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी या नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्यानंतर, महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर एकत्रित राष्ट्रीय एकता दिवस शपथ दिली.
यानंतर, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमीत्त महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते ग्रामपंचायत कार्यालय, अवसरी (खुर्द) ते परत महाविद्यालय या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी तर महाविद्यालयात सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते स्टार कॉर्नर व परत महाविद्यालय या मार्गावर “एकता दौड” (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात आले. प्राचार्यांच्या हस्ते सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत फीत कापून व ग्रीन सिग्नल देऊन सदर दौड प्रारंभ झाली. “भारत हमारा महान है, एकता हमारी शान है”, “भारत माता कि जय”, “वंदे मातरम्”, “सरदार वल्लभभाई पटेल कि जय” अशा घोषणा देत या दौडमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून ही दौड यशस्वी केली. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाखानण्याजोगा होता.
राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी समन्वयक कुमार हर्षल बर्डे, कुमारी श्रुती काळे आणि सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी केले. याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: