शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). येथे ७२ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने पार पडला. महाविद्यालायाचे प्राचार्य .डॉ.ए.एस.पंत यांनी ध्वजारोहण केले व उपस्थित सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी “ आज का भारत” या विषयावर पथनाट्य सदर केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थांद्वारा रस्ता अपघात सुरक्षा ( Road Safety) संदर्भात कार्यक्रमाचे चे आयोजन करण्यात आले होते .त्यात विद्यार्थांनी रस्त्यावर अपघात झाल्यास कशा प्रकारे अपघातग्रस्त व्यक्तीची मदत करावी याविषयी प्रबोधन केले .
यानंतर विधार्थ्यांकरिता व्हॉलीबॉल व कबड्डी या खेळाचे प्रदर्शनीय सामने आयोजित करण्यात आले होते .सदरील संस्थेतील कार्यक्रम जिमखाना प्रमुख यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेतील विभागप्रमुख ,अधिकारी ,कर्मचारी ,विधार्थी व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: