शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द या महाविद्यालयामध्ये दि. ०१/०२/२०२४ रोजी दु.१२.०० ते १.०० या वेळेत डेलनेटच्या वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. सदरचे वेबीणार हे डेलनेट आणि शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खु.) यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले होते.
सदर वेबीनार माध्यमातून महाविद्यालयाने विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी (वाचक) याना डेलनेट Platform संबंधी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे महविद्यालय वर्गणीदार झालेल्या डेलनेटच्या. Platform चा अधिकाधिक व सुयोग्य पद्धतीने वापर करण्यासंबंधी तसेच वापर वाढण्याच्या दृष्टीने विविध मार्गदर्शनपर सूचना तसेच माहिती डेलनेटचे तज्ञ श्री. रोहिदास राठोड यांचे द्वारे देण्यात आली. सदर वेबीनारला महाविद्यालयातील सुमारे ३१५ वाचकांनी नोंदणी केली होती. सदरच्या वेबीणारकरीता सुमारे १८० वाचक ऑनलाईन उपस्थित होते.
सदर वेबीनार पार पाडण्यासाठी डॉ. संगीता कौल (संचालिका, डेलनेट) आणि श्री. रोहिदास राठोड (तज्ञ, डेलनेट) तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे व श्रीमती एन.पी. वाघ (प्रथालय प्रभारी अधिकारी) याचे सहकार्य लाभले. सदरील वेबीणार यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तसेच श्री, विकारा जगताप, श्रीमती रणुका टेंबेकर, श्री शुभम आढारी या ग्रंथालयीन कर्मचार्यानी परिश्रम घेतले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: