Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द आणि सायबर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यामाने ०१/०२/२०२० रोजी सायबर गुन्हे जागरूकता अभियान राबविण्यात आले. सदरील कार्यक्रमाकरिता मा.संदीप पाटील (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. मंगेश चव्हाण सहा. पोलीस अधीक्षक सायबर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांनी मार्गदर्शन केले.

श्री. मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, “सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच त्याद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दीड वर्षांत सोशल मीडियावरून झालेल्या गुन्ह्यांच्या खूप तक्रारी पोलिसांच्या सायबर सेलकडे आल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आणि त्यामध्ये इंटरनेट असणे ही बाब आता आवश्यक झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना सोशल मीडियाच्या वापराचे धोकेही पूर्णत: माहीत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करून त्रास ओढवून घेतल्याच्या घटनांही वाढत आहेत. अनेक तरुण-तरुणी कमी वय असूनही खोटी माहिती देऊन सोशल मीडियावर प्रोफाइल उघडत आहेत. त्यामुळे ते अगदी सहज ‘सायबर गुन्हेगारांच्या’ जाळ्यात सापडत आहेत. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करणे, फेसबुक, व्हॉट्स अॅपवरून अश्लील संदेश पाठविणे, मुलींच्या फोटोंचा गैरवापर करणे, समाजात तेढ निर्माण होईल असा मजकूर टाकणे, बदनामीकारक मजकूर किंवा फोटो पोस्ट करणे, फेसुबकचे अकाऊंट हॅक करून खंडणी उकळणे यांची संख्या जास्त आहे.सोशल मिडीयाचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी ऑनलाइन पेमेंट पोर्टल वरून पैशाचा व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांमध्ये सामान्य नागरिकांना ,महिलांना कशाप्रकारे अडकवून फसवणूक केली जाते याबाबत ज्वलंत उदाहरणाद्वारे मार्गदर्शन केले. फसवणूक होऊ नये म्हणून सर्वांनी आपले पासवर्ड सुरक्षित जतन केले पाहिजे ,तसेच सोशल मीडियाचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती नसल्याचा फटका अनेक तरुणींना बसला आहे. ‘व्हॉट्स अॅप’वरील ‘डीपी’ अनोळखी व्यक्तीला दिसू नयेत, यासाठी विशिष्ट ‘सेटिंग’ असते. मात्र, याची माहिती अनेकांना नाही. अनेकदा आरोपी मुलीच्या नावे बनावट अकाउंट तयार करून इतर मुलींशी संपर्क साधतात. त्यामुळे तरुणींनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो, वैयक्तिक माहिती शेअर करू नये. सोशल मीडियाचा वापर करण्यात मुले आघाडीवर आहेत. त्यामुळे पालकांनी मुले जास्त वेळ कशावर घालवतात, यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्या विविध शंकांचे निरसन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी सायबर सुरक्षा ही काळाची गरज असून सर्वांनी याबाबत जागरूक राहून काळजी घेणे आवश्यक आहे असे सांगितले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे इंटरनेट व्यवस्थापक समन्वयक श्री.डी.जे.परेरा व श्रीमती पी.आर.देशमुख यांच्या प्रयत्नाद्वारे करण्यात आले होते.

 


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on:
01/08/2025 16:05:58