शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये दि. १४/२/२०१९ रोजी शैक्षणीक वर्ष २०१७ -१८ च्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात पार पडला. प्रथम पदवी ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर एम.के.सी.एल. चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.विवेक सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सरस्वती स्तवन गायनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर सर्वांनी विद्यापीठ गीत गायन केले.
डॉ.एम. जे. पाबळे महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी यांनी विद्यापीठ ध्वज हाती घेवून मिरवणुकीचे नेतृत्व केले तसेच आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
या प्रसंगी प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी शैक्षणीक वर्ष २०१७-१८ मध्ये महाविद्यालाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे विश्लेषण केले जसे की, विद्यार्थ्यांनी, हॅकॅथॉन, रोबोकॉन, ई -यंत्र स्पर्धेत मिळवलेले यश, विविध आंतरमहाविद्यालीन, कब्बडी, बुद्धिबळ, खो-खो स्पर्धांमध्ये तसेच भीमाशंकर करंडक इ., तांत्रिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी लाक्षणिक यश मिळविले आहे असे सांगितले.
या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे डॉ.विवेक सावंत यांनी अनमोल मार्गदर्शन करून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली. या प्रसंगी ते म्हणाले की, हे महाविद्यालय ग्रामीण भागात सुरु होऊन नावारूपास आले आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. सद्यस्थितीत अभियंता हा सर्व क्षेत्रात निपूण असला पाहिजे तरच त्याला नोकरीची संधी उपलब्ध राहील. तुम्ही सतत उत्कृष्ट कार्य करून अनुभवातून आजीवन ज्ञानग्रहण केले पाहिजे. व त्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उत्कर्षासाठी करून देशाला शक्तीशाली बनवले पाहिजे. तसेच सर्वांनी नैतिक मुल्ये जपून सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे.
या पदवी प्रदान समारंभाकरीता यंत्र, अणुविद्दुत, उपकरणीकरण, संगणक, स्थापत्य, स्वयंचल या शाखेचे एकूण १८० विद्यार्थी पदवीग्रहणाकरीता उपस्थित होते. पदवीग्रहण हा त्यांचा आयुष्यातील महत्वाचा क्षण होता. यावेळी प्रत्येक शाखेच्या विभागप्रमुखांनी त्यांच्या शाखेच्या विद्यार्थ्यांच्या नावाचे वाचन केले व सन्मानिय पाहुणे डॉ.विवेक सावंत व मा. प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास सर्व विभागांचे विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. जोशी, डॉ. डी. आर. पानगव्हाणे, डॉ. एस. यु. घुमरे, डॉ. डब्लु. एम. देऊळकर, डॉ. एम.आर. बोनगुलवार, डॉ. एम.एस. नागमोडे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती योगीता चौधरी व श्रीमती दीपा माहेश्वरी यांनी केले.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: