Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ससून हॉस्पिटल रक्तपेढी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२६/१०/२०२३ (गुरुवार) रोजी सणासुदीच्या कालावधीत भासणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी श्री. किरण ठाकरे, समाजसेवा अधीक्षक, ससून हॉस्पिटल रक्तपेढी, पुणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ मंगेश पांचाळ, श्रीमती दीपा माहेश्वरी, ससून हॉस्पिटल रक्तपेढीतील डॉक्टर, कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शिबिराची सुरुवात फीत कापून, सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. किरण ठाकरे म्हणाले की “रक्तदान शिबीरामध्ये स्वयंसेवकांचा उत्साह कौतुकास्पद आहे’’. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी याप्रसंगी सांगितले की, “रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे, त्यामुळे महाविद्यालयातील सर्वांनी रक्तदान शिबिरात सहभागी होवून रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी केले”. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांनी, “सणासुदीच्या काळात रक्ताचा भासणारा तुटवडा व या कालावधीत रक्तदान शिबीर आयोजनाची असणारी आवश्यकता उपस्थितांना पटवून दिली व जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले”. याप्रसंगी महाविद्यालयातील काही विभागप्रमुख, प्राध्यापक व कर्मचारी यांनी स्वतः रक्तदान केल्यामुळे मुलांचा उत्साह द्विगुणीत झाला. या शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी/विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात महाविद्यालयातील तब्बल ४०० विद्यार्थ्यांनी रक्तदानाची इच्छा दर्शविली परंतु तांत्रिक अपत्रातेमुळे ते रक्तदान करू शकले नाहीत. या शिबिरामध्ये एकूण १३५ रक्तदात्यांनी यशस्वीपणे रक्तदान केले.

र कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी समन्वयक कुमार हर्षल बर्डे, कुमारी श्रुती काळे आणि सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी केले. याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे व रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले.