Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

या स्वच्छता पंधरवड्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सकाळी दोन तास आणि सायंकाळी एक तास अशी स्वच्छता मोहीम सलग पंधरा दिवस महाविद्यालय परिसर, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह परिसर, आणि महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते मुलींचे वसतिगृह परिसर येथे राबविली. या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांचे विविध १० गट बनवून त्यांना कामे वाटून देण्यात आली. या मोहीमेदरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसर, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह परिसर, आणि महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार ते मुलींचे वसतिगृह परिसर प्लास्टीकच्या पिशव्या, दुभाजकावरील कचरा, तन आणि इतर घनकचरा संकलीत करून स्वच्छ व प्लास्टिक मुक्त केला.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने घोषणाबाजी करत या स्वच्छता पंधरवड्यामध्ये श्रमदान करत आपला सहभाग नोंदविला. तसेच स्वच्छता आणि स्वच्छतेचे आपल्या शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्व पटवुन दिले. याशिवाय, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी तेलाचे पत्र्याचे डबे जमा करून त्यांची रंगरंगोटी केली व ते डबे डस्टबिन म्हणून महाविद्यालय परिसरात विद्यार्थी व इतरांच्या वापरासाठी ठिकठिकाणी ठेवले. यासोबतच स्वयंसेवकांनी स्वच्छतेचे संदेश देणारे, डस्टबिन वापराचा संदेश देणारे आकर्षक पोस्टर्स ठिकठिकाणी लावले.

"राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन बरेचसे उपक्रम महाविद्यालय स्तरावर घेतले जातात आणि एक विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक नात्याने आम्हाला सर्वउपक्रमामध्ये आमचे योगदान देण्याची आणि समाजासाठी काहि करू पाहण्याची प्रेरणा मिळते", असे मत सर्व स्वयंसेवकांनी नोंदविले.

सदर स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विदयार्थ्यी समन्वयक कुमार प्रशांत ढोले, कुमारी चारुशीला पानवळ आणि सर्व रासेयो स्वयंसेवक यांनी केले. याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मंगेश पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले.