Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी कु. तेजस मच्छिंद्र जाधव व कु. जान्हवी किरण देशपांडे, तृतीय वर्ष, उपकरणीकरण व नियंत्रण अभियांत्रिकी यांनी दि.०९ मार्च, २०२३ ते दि.११ मार्च, २०२३ या दरम्यान समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटशन्सच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, बेल्हे, ता. जुन्नर जि. पुणे येथे पार पडलेल्या “वैभवशाली जुन्नरचे पर्यटन” या तीन दिवसीय विद्यापीठस्तरीय विशेष शिबिरामध्ये सहभाग नोंदविला.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, बेल्हे तसेच जुन्नर पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने "वैभवशाली जुन्नरचे पर्यटन" या विषयावर तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते. सदर "वैभवशाली जुन्नरचे पर्यटन" या विषयावर आधारीत तीन दिवसीय विशेष शिबिरासाठी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी(खुर्द) या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी कु. तेजस जाधव व कु. जान्हवी देशपांडे, यांची महाविद्यालायीन पातळीवर निवडकरण्यात आली होती.

या शिबिरासाठी पुणे, नगर आणि नाशिक विभागातून एकूण १७० विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक, भौगोलिक वास्तू व जुन्नर तालुक्यातील पर्यटन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

वैभवशाली जुन्नरचे पर्यटन कार्यशाळा ही महाविद्यालयीन युवकांमध्ये जुन्नर पर्यटनाविषयी जाणीव जागृती निर्माण करणारी ठरली. डॉ. राधाकृष्ण गायकवाड व डॉ. लहुजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक बाबतीत वैभवशाली जुन्नरचे पर्यटन यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले. श्री. यश मस्करे यांनी जैवविविधता, खगोलीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. श्री. मनोज हाडवळे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने आणि कुतूहलाने विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे देत पर्यटनातून नवनवीन रोजगाराच्या संधीची माहिती दिली व मार्गदर्शन केले.

सदर विध्यार्थ्यांना महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. मंगेश पांचाळ, तसेच उपकरणीकरण व नियंत्रण अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. नवनाथ नेहे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.