News & Events
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात संगणक विभागामध्ये स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनअंतर्गत हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन दि. १८.१.२०२० रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.आर.एल.गणेशकर (वरिस्ट व्यवस्थापक इन्फोसिस) यांच्या हस्ते सरस्वती व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
या प्रसंगी श्री.आर.एल.गणेशकर यांनी सांगितले की, “जगामध्ये प्रत्येक क्षेत्रात बदल होत आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करून देशातील विविध प्रश्न सोडवले पाहिजेत”
प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपलब्ध उपकरणांचा पुरेपूर वापर करून आपल्या सभोवताली समाजास भेडसावणारे प्रश्न त्यांच्या तांत्रिक कौशल्याद्वारे सोडवले पाहिजेत व विविध हॅकॅथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला पाहिजे.”
महाविद्यालयाचे हॅकॅथॉन समन्वयक श्री.डी.जे.परेरा यांनी स्पर्धेचा हेतू, उद्देश व प्रास्ताविक केले व अद्याप पर्यंत महाविद्यालयास राष्ट्रीय स्तरावर यश मिळालेले नमूद केले.विभागप्रमुख डॉ.एस.यु.घुमरे यांनी यावेळी संगनक विभागातील विविध स्पर्धेतील यश तसेच आतापर्यंत विविध कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांचे लाक्षणिक यशाबद्दल माहिते दिली.
सदरील स्पर्धेमध्ये एकूण महाविद्यालयातील १३ संघानी सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या विजयी संघांची नावे खालीलप्रमाणे आहेत. सॉफ्टवेअर विभागातून इलेक्ट्रिकस्कॅड या संघाने डॉक्टरांना उपयुक्त असे व्हॉईस प्रेसिपशन मेकर यावर सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळवला.हार्डवेअर विभागात स्पेल मार्ल या संघाने शेतकऱ्यासाठी उपयुक्त असे माती परीक्षण यावर सादरीकरन करून प्रथम क्रमांक मिळवला.एकून सहभागी १३ संघापैकी ७ संघांची निवड देश पातळीवर होणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२० या स्पेर्धेकारीता झाली.या हॅकॅथॉन स्पर्धेच्या परीक्षणाचे काम श्री.आर.एल.गणेशकर,डॉ एस. यु.घुंबरे ,डॉ एम . आर .बोनगुलवार,डॉ एन.पी फुटाणे यांनी केले. सदरील कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
Developed & Managed by Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
Security Policy | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
Security Policy | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on:01/08/2025 15:15:41