अवसरी : शासकीय अभियात्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी(खुर्द) येथे स्वयंचल अभियांत्रिकी विभागात अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद (AICTE),व इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन (ISTE) आणी महाविद्यालय आयएसटीई चाप्टर यांच्या संयुकत विद्यामांने “आयओटीची व्याप्ती आणि ऑटोमोटिव्ह आणि कृषी उद्योगात त्याचे उपयोग ”) या विषयावर एक आठवड्याचा ऑंनलाईन अध्यापक विकास कार्यक्रम दि.२२ ते २७ मार्च २०२१ दरम्यान संपन्न झाला .सदरील कार्यशाळा अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद(AICTE) ,व इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्यूकेशन (ISTE) द्वारे प्रायोजित करण्यात आला. कार्यशाळे करीता पूर्ण अनुदान एआयसीटीई / आयएसटीई तर्फे देण्यात आले.
सदरकार्यशाळेचेउद्घाटनमहाविद्यालयाचेप्र.प्राचार्यप्रा.एस.व्ही.जोशी यांचेहस्तेव प्रमुख अतिथीडॉ. प्रतापसिंह देसाई (अध्यक्ष आयएसटीई, नवी दिल्ली),सन्माननीय अतिथी म्हणून कर्नल बी वेंकट
(संचालक, प्राध्यापक विकास कक्ष, एआयसीटीई नवी दिल्ली)तसेच डॉ.डी.आर. पानगव्हाणे(कार्यशाळा संयोजक व स्वयंचल अभियांत्रिकी विभाग प्रमुख)यांच्याउपस्थितकरण्यातआले. यावेळी प्र.प्राचार्यम्हणालेकीसध्या इंटरनेट ऑफ थिंग्जची अत्यंत गरज असून ऑटोमोटिव्ह आणि कृषी उद्योगात क्षेत्रात त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे .सर्व सहभागी प्रशिक्षणार्थिनीऑटोमोटिव्ह आणि कृषी उद्योगात आयओटीची च्या विविध उपयोगाबद्दल बद्दल ज्ञान आत्मसात करावीत व त्यांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा..कार्यशाळा संयोजक डॉ.डी.आर.पानगव्हाणे यांनी कार्यशाळेचे महत्व विषद करताना सांगितले की ,ऑटोमोटीव्ह व कृषी हे दोन्ही वेगवेगळे क्षेत्र आहेत .दोन्ही क्षेत्रात आयओटी सारख्या तंत्रज्ञांनाचा वापर करून आपण त्यांची कार्यक्षमता वाढवू शकतो तसेच देशातील सर्व शाखांच्या अभियंत्यांना, संशोधनकरणाऱ्यांना व शिक्षकांना समाजामध्ये विविध कामाकरिताआयओटीउपयुक्त ठरणार आहे. विविध उपकरणे सेन्सर सह बनवल्या जाऊ शकतात. इंटर्ंनेटशी संवाद साधू शकतात. त्यामुळे जगातल्या कोणत्याही ठिकाणाहून कार्यन्वित केली जाऊ शकतात. तसेच ऑटोमोटीव्ह क्षेत्रात वाहतुकीचे व्यवस्थापन करणे ,डेटा ट्रान्सफर करणे, वाहन ते वाहन संवाद साधणे याप्रकारच्या घडामोडी आयओटीचा उपयोग करून स्मार्ट गतिशीलतेकडे वाटचाल करत आहे. सदरील कार्यशाळेच्या आयोजनामुळे आयओटीच्या तांत्रिक बाबीविषयी प्राध्यापकांमध्ये जागरूकता येईल व त्याचा उपयोग विद्यार्थ्याच्या कौशल विकासात होईल.
या कार्यशाळेकरिता एकूण १०८ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेकरीता उद्योग क्षेत्रामधील व शैक्षणिक संस्थामधील विविध नामांकित तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केल्या गेले होते. श्री.अनिल कोलेकर संचालक व सह-संस्थापक - स्मार्ट बिझ कॉन्स. अँड सोल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे), श्री.अंजुम मुजावर (एल अँड टी मुंबई), श्री.मनोज देसाई (जनरल मॅनेजर, ऑटोमोटिव इलेक्ट्रॉनिक्स विभाग, एआरएआय पुणे), श्री.तुषार करंडे मॅनेजर क्रॉप मॅनेजमेन्ट टेक्नॉलॉजी नेटाफिम इरिगेशन पुणे),श्री. एम.के.खंदुजा (प्रधान सल्लागार आणि संचालक एकीकरण, गुडगाव, नवी दिल्ली), श्री.निर्मल माथारू (सीईओ सत्यम ऑटो. कॉम्प.प्रा.प्रा. लि. गुडगाव, नवी दिल्ली), डॉ.विश्राम बापट (डेटाबाईट सर्व्हिसेस अँड सिस्टम्स सांताक्रूझ (पूर्व) मुंबई ), श्री.एस.सर्वानन (हेड-स्मार्ट इम्प्लीमेन्ट्स आणि मशीनरी महिंद्रा रिसर्च व्हॅली चेन्नई), श्री.विजय हाके व श्री वरून दबके (सोशल वर्कर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनशी संलग्न),श्री.सोम शुभ्र चक्रवर्ती (सहाय्यक प्राध्यापक कृषी व अन्न अभियांत्रिकी विभाग, आयआयटी खरगपूर), प्रा . डॉ. असीम तेवारी (प्राध्यापक यंत्र आयआयटी मुंबई), श्री.मिलिंद देशपांडे (महिंद्रा गुणवत्ता गुणवत्ता संस्था, नाशिक), श्री.पवनकुमार फाकटकर (केपीआयटी पुणे) यांची एकूण १८ ऑनलाइन सत्रे घेण्यात आली.या कार्यशाळेत इंटरनेट ऑफ थिंग्ज मधील नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाविषयी तसेच जगातील प्रत्येक क्षेत्रात (औदोयोगिक, वैद्यकीय,सामाजिक, सैन्य,विमान, घरगुती इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे नियंत्रण ई.) कसा वापर होत आहे याबाबत मार्गदशन करण्यात आले.
सदर कार्यशाळेचा समारोप दि.२७/०३/२०२१ रोजी झाला. समारोप कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणुन प्राध्यापक. डॉ. सचिन कोरे (आयआयटी गोवा) यांनी मार्गदर्शन केले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांनी कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले .स्वयंचल अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. डी. आर.पानगव्हाणे यांनी संयोजक, श्री.व्ही.वाय ढेपे यांनी समन्वयक व श्री.आर.पी.काकडे यांनी . सह समन्वयक म्हणून काम पाहिले.
- प्र.प्राचार्य प्रा.एस.व्ही.जोशी डॉ. डी. आर.पानगव्हाणे (संयोजक) श्री.व्ही.वाय ढेपे समन्वयक व श्री.आर.पी.काकडे सह समन्वयक उद्घाटन प्रसंगी
- श्री.अंजुम मुजावर (एल अँड टी मुंबई
- डॉ.विश्राम बापट (डेटाबाईट सर्व्हिसेस अँड सिस्टम्स सांताक्रूझ (पूर्व) मुंबई ) मार्गदर्शन करताना
- श्री.एस.सर्वानन (हेड-स्मार्ट इम्प्लीमेन्ट्स आणि मशीनरी महिंद्रा रिसर्च मार्गदर्शन करताना व्हॅली चेन्नई)
- श्री.तुषार करंडे मॅनेजर क्रॉप मॅनेजमेन्ट टेक्नॉलॉजी नेटाफिम इरिगेशन पुणे),मार्गदर्शन करताना
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                    Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
Website last updated on: