Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

शासकीय अभियात्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी(खुर्द) येथे स्वयंचल अभियांत्रिकी विभागात अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद एआयसिटीई-आयएसटीई व महाविद्यालय आयएसटीई चाप्टर यांच्या संयुकत विद्यामांनाने “आयओटीची व्याप्ती आणि ऑटोमोटिव्ह आणि कृषी उद्योगात त्याचे उपयोग” या विषयावर एक आठवड्याचा ऑंनलाईन अध्यापक विकास कार्यक्रम दि.२२ ते २७ फेब्रुवारी २०२०१ दरम्यान संपन्न झाला . सदरील कार्यशाळा ही अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद , द्वारे प्रायोजित करण्यात आली . कार्यशाळे करीता पूर्ण अनुदान एआयसीटीई तर्फे देण्यात आले.

सदर कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांचे हस्ते व प्रमुख अतिथि डॉ. अनिल सहस्रबुद्धे (अध्यक्ष एआयसीटीई, नवी दिल्ली), विशेष अतिथि डॉ. भाभारंजन शर्मा (आयएसटीई नवी दिल्ली) ,डॉ.कमल व्होरा (वरिष्ठ संचालक व प्रमुख एआरएआय अकादमी, पुणे) तसेच डॉ.डी.आर.पानगव्हाणे (कार्यशाळा संयोजक व स्वयंचल अभियांत्रिकी विभाग प्रमुख ) यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी प्राचार्य म्हणाले की सध्या इंटरनेट ऑफ थिंग्जची अत्यंत गरज असून ऑटोमोटिव्ह आणि कृषी उद्योगात क्षेत्रात त्याचा उपयोग करून उत्पादकता वाढवता येऊ शकते. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थिनी ऑटोमोटिव्ह आणि कृषी उद्योगात आयओटीची च्या विविध उपयोगाबद्दल बद्दल ज्ञान आत्मसात करावीत व त्यांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. कार्यशाळा संयोजक डॉ.डी.आर.पानगव्हाणे यांनी कार्यशाळेचे महत्व विषद करताना सांगितले की ,ऑटोमोटीव्ह व कृषी हे दोन्ही वेगवेगळे क्षेत्र आहेत . दोन्ही क्षेत्रात आयओटीची सारख्या तंत्रज्ञांनाचा वापर करून आपण त्यांची कार्यक्षमता वाढवू शकतो तसेच देशातील सर्व शाखांच्या अभियंत्यांना, संशोधन करणाऱ्यांना व शिक्षकांना समाजामध्ये विविध कामाकरिता आयओटी उपयुक्त ठरणार आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे ,शेतीची उत्पादकता वाढवण्याकरिता, खत निर्मिती करण्याकरिता आपण इंटरनेट ऑफ थिंग्ज ,मशीन लर्निंग, आरीफिशियल इंटेलिजन्स, ड्रोण यासारख्या तंत्रज्ञांनाचा वापर करू शकतो. ही उपकरणे सेन्सर सह बनवल्या जाऊ शकतात. इंटर्ंनेटशी संवाद साधू शकतात. त्यामुळे जगातल्या कोणत्याही ठिकाणाहून कार्यन्वित केली जाऊ शकतात. तसेच ऑटोमोटीव्ह क्षेत्रात वाहतुकीचे व्यवस्थापन करणे , डेटा ट्रान्सफर करणे, वाहन ते वाहन संवाद साधणे याप्रकारच्या घडामोडी आयओटीचा उपयोग करून स्मार्ट गतिशीलतेकडे वाटचाल करत आहे. सदरील कार्यशाळेच्या आयोजनामुळे आयओटीच्या तांत्रिक बाबीविषयी प्राध्यापकांमध्ये जागरूकता येईल व त्याचा उपयोग विद्यार्थ्याच्या कौशल विकासात होईल.

या कार्यशाळेकरिता एकूण ९७ प्रशिक्षणार्थि सहभागी झाले होते. या कार्यशाळेकरीता उद्योग क्षेत्रामधील व शैक्षणिक संस्थामधील विविध नामांकित तज्ञ व्यक्तींना आमंत्रित केल्या गेले होते. डॉ.कमल व्होरा, (वरिष्ठ संचालक व प्रमुख एआरएआय अकादमी, पुणे)), श्री. विक्रांत संखे (विपणन व कार्यनीती प्रमुख, सिमेंस मुंबई), डॉ.पराग कुलकर्णी (मुख्य कार्यकारी अधिकारी व शास्त्रज्ञ पुणे), श्री.देव्वेश रथ (वरिष्ठ महाप्रबंधक, टेक करारो इंडीया लि.पुणे), श्री.निलेश हजारे (सहाय्य्क जनरल मॅनेजर, करारो इंडीया लि.पुणे), श्री.उदय जोशी (जनरल मॅनेजर,जॉन डेरे इंडीया प्रा.लि.), श्री.दत्तात्रय पार्ले(तंत्रज्ञान तज्ञ,सिमुलेशन सेंटर पुणे), श्री.विजय हाके (सामाजिक कार्यकर्ता), श्री.राकेश पांडे (उद्योग, सिमेन्स लि.बंगलोर), ्री.चेतन कांबळे (सिमेन्स लि.मुंबई), डॉ.टी.बी.बस्टवाड (प्राध्यापक,राहुरी,कृषी), श्री.र.कडांची (संस्थापक,सायबर लायटिक्स तंत्रज्ञान पुणे)यांची एकूण १७ ऑनलाइन सत्रे घेण्यात आली.

सदर कार्यशाळेचा समारोप दि.२७/०२//२०२१ रोजी झाला.सदर प्रशिक्षिण कार्यशाळेच्या आयोजनकरिता महविद्यालयाचे प्राचार्य . डॉ.अ.शि.पंत यांचे मार्गदर्शन लाभले. समारोप कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथि म्हणुन श्री.सं.निबंधे (वरिष्ठ उपायुक्त,संचालक, एआरएआय, पुणे) यांनी प्रशिक्षणार्थिना मार्गदर्शन केले. स्वयंचल अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ..डी.आर.पानगव्हाणे यांनी संयोजक, डॉ.एम.जे.पाबळे यांनी समन्वयक व श्री.आर.तेलतुमडे यांनी सह समन्वयक म्हणून काम पाहिले.


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: