Click to change the language

  

#
DTE CODE - 6004, PUNE University CODE - cegp014980, Pune University Exam. Center No. : 4078, Automobile Engg. & Mechanical Engg. Programmes are accredited by NBA upto 2024-25

News & Events

अवसरी : शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्दच्या ७० विद्यार्थांनीना टेकसक्षमच्या तज्ञ प्रशिक्षकानी दि .१८ ऑगस्ट २०२१ पासून वेब डेव्हलपमेंट आणि डिजिटल मार्केटिंग व कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजीन्स) या विषयांच्या तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.सदर प्रशिक्षण ऑन लाईन देण्याकरीता टेकसक्षम चे श्री बळवंत गोरड व श्रीमती पूजा अग्रवाल उपस्थित होते. प्रशिक्षण कालावधीतील विद्यार्थांनीची उपस्थिती, प्रामाणिकपणा आणि कामगिरीच्या आधारे ,ऐश्वर्या चेमाटे, पूजा शिंदे , वैष्णवी स्वामी, आरती गायकवाड व शिवांजली सावंत या विद्यार्थिनिंची एज्युनेट फाउंडेशनने निवड केली, व त्यांना टेकसक्षमद्वारे लॅपटॉप वाटप करण्यात आले . सदरील लॅपटॉप लिनोवो कंपनीचे टेंथ जनरेशन,आय थ्री प्रोसेसर व ४ जीबी रॅम युक्त आहेत. सदर विद्यार्थिनींनी प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन, आर्टिफिशिअल इंटेलिजीन्स द्वारे शेतातील पिकांचे जंगली प्राण्यां द्वारे संरक्षण करणे तसेच व्यक्तींनी गर्दीमध्ये कोवीड- १९ फेस मास्क लावले आहे की नाही ते शोधणे यावरती प्रकल्पाचे काम विद्यार्थिनी करत आहेत.

टेकसक्षम हा उपक्रम एज्युनेट फाउंडेशनचा स्याप (SAP) आणि मायक्रोसॉफ्ट यांचा संयुक्त कार्यक्रम आहे. एज्युनेट फाउंडेशन रोजगारक्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देते. राष्ट्रीय पदचिन्हांसह, एज्युनेट फाउंडेशन कार्यक्रम, ऑनलाइन आणि प्रशिक्षकांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात त्याचा दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना फायदा होतो. तरुण महिलांना प्रगत आयटी (संगणक प्रोग्रामिंग) कौशल्ये प्रशिक्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. यामुळे महिलांची रोजगारभिमुखता वाढते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .डी.आर. पानगव्हाणे यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे तसेच “सदरील तांत्रिक प्रशिक्षण दिल्यामुळे विद्यार्थिनी सक्षम होतील तसेच त्यांना विविध समाज उपयोगी प्रकल्प तयार करण्याकरता संसाधनांची कमतरता भासणार नाही.” प्रकल्प पूर्ण झाल्यावर सदरील विद्यार्थिनी लॅपटॉप संस्थेस परत करणार असून त्यांचा वापर पुढील वर्षातील गरजू निवडक विद्यार्थीनीं करता करण्यात येणार आहे . यामुळे लॅपटॉप कायम वापरात राहतील. सदरील तांत्रिक प्रशिक्षनाकरीता महविद्यालयातर्फे समन्वयक म्हणुन डॉ.एस.एस.देशपांडे व सह समन्वयक म्हणून श्रीमती पी.व्ही. कुलकर्णी यांनी काम पहिले. सदरील प्रशिक्षण आयोजनाकरिता संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.यु.घुमरे यांचे मार्गदर्शन लाभले .

टेकसक्षमद्वारे लॅपटॉप वाटप करते वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .डी.आर. पानगव्हाणे ,समन्वयक डॉ.एस.एस.देशपांडे व सह समन्वयक श्रीमती. पी.व्ही. कुलकर्णी संगणक विभाग प्रमुख डॉ. एस.यु.घुमरे उपस्थित होते.


                                          Developed & Managed by   Government College of Engineering & Research Avasari ,Pune.
                                                            Web-Information-Manager (Website Content Managed by Computer Engineering Department)
                                   
Security Policy  | Hyperlinking Policy | Terms & Conditions | Privacy Policy | Copyright Policy | CAP | CMAP | CRP | Help
  Best accessible in Google Chrome - 1024x768 Resolution
Website last updated on: