News & Events

अवसरी : भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे “शाश्वत विकासासाठी ऊर्जा आणि पर्यावरण”( एनर्जी अँड एन्व्हायरमेंट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट) ही राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. सदर परिषदेचे उद्घाटन दि ५/०७/२०२२ रोजी डॉ. डी. व्ही. जाधव (सहसंचालक विभागीय कार्यालय पुणे) व श्री राहुल अगरवाल (संचालक कॅपजेमिनी ) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .डी. आर. पानगव्हाणे डॉ. डी. आर. नंदनवार (प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन अवसरी) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

डॉ. एस. एस. सोनवणे, (विभागप्रमुख यंत्र, संयोजक ) व. डॉ. सी.एम. सेवतकर (सचिव) यांनी प्रस्ताविक केले व सदर परिषदेच्या आयोजना मागचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की ही एक उदयोन्मुख तांत्रिक परिषद आहे आणि ऊर्जा रूपांतरण उपाय आणि पर्यावरण संरक्षणासाठी महत्वाची आहे. या परिषदेमध्ये भारतातील एकूण ७० शोधप्रबंध प्राप्त झाले.या वेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते शोधप्रबंध पुस्तिका प्रदर्शित करण्यात आली.

राहुल अगरवाल(संचालक कॅपजेमिनी ) यांनी सद्यस्थितीत ऊर्जा निर्मिती व वापरामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे तरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल करून भविष्यात योग्य प्रकारे ऊर्जेचा वापर करता येऊ शकतो असे नमूद केले. तसेच त्यांनी ग्लोबल वार्मिंग समस्यांबाबत बाबत आपण लक्ष दिले पाहिजे असे सांगितले

डॉ. डी. व्ही. जाधव (सहसंचालक विभागीय कार्यालय पुणे) यांनी सदरील परिषदेचे आयोजन व सहभागी होण्याचे महत्त्व विशद केले याकरता त्यांनी जगदीशचंद्र बोस ,जोसेफ फोरीअर व मार्कोनी, या वैज्ञानिकांना अशा परिषदांचा कसा उपयोग झाला याबाबतचे दाखले दिले . ही परिषद शास्त्रज्ञ, संशोधक, औद्योगिक अभियंते आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांची संशोधन कामगिरी सादर करण्यासाठी आणि उर्जा क्षेत्रातील तज्ञांसह नवीन सहयोग आणि भागीदारी विकसित करण्यासाठी उत्कृष्ट संधी प्रदान करेल असे सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पानगव्हाणे यांनी अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचे महत्त्व अधोरेखित केले यामध्ये त्यांनी भविष्यात इतर स्त्रोतांपेक्षा सौर ऊर्जा ही एक महत्त्वाचा ऊर्जा स्त्रोत म्हणून बघितला जाईल असे सांगितले .डॉ. डी. आर. नंदनवार यांनी अपारंपारिक ऊर्जा स्तोत्र व त्यांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.

सदर परिषदेमध्ये श्री राहुल अग्रवाल (संचालक कॅपजेमिनी) व डॉ. संजीव सूर्यवंशी (प्राध्यापक ,विभाग प्रमुख यंत्रविभाग एसएसव्हीपीएस धुळे ) श्री स्वप्नील बाथे (संचालक एनरजीका रीनेवेबल प्रा.ली.) प्रा .मकरंद घांगरेकर (आयआयटी खरगपूर),डॉ योगेश कोकीळ ,(सहाय्यक संचालक ईमरसन ऑटोमेशन सोल्युशन) या ऊर्जा क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे उर्जाविषयक विविध परिसंवाद झाले.

श्री विकास रस्तोगी मुख्य सचीव उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,डॉ अभय वाघ संचालक तंत्र शिक्षण संचालनालय मुंबई , यांच्या मार्गदर्शनाखाली सदर राष्ट्रीय परिषद संपन्न झाली . सदर परिषदेचा समारोप दि .०६/०७/२०२२ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .डी. आर. पानगव्हाणे यांच्या प्रमुख मार्गदर्शन व अध्यक्षतेखाली झाला यावेळी डॉ. एस. एस. सोनवणे, (विभागप्रमुख यंत्र, संयोजक ) व. डॉ. सी.एम. सेवतकर (सचिव),डॉ मनोज नागमोडे ,डॉ एम.जे.पाबळे,डॉ. यु. एस.काकडे ,डॉ. देऊळकर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते . अनुजा देशपांडे व रेणुका देसाई यांनी सूत्रसंचालन केले . डॉ .एस.व्ही.क्षीरसागर यांनी परिषदे मधील महत्वाच्या घडामोडी सांगितल्या डॉ. सी.एम. सेवतकर (सचिव),यांनी आभारप्रदर्शन केले.