News & Events

अवसरी : शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विस्तारीत इमारतीचा उद्घाटन समारंभ व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व शासकीय तंत्र निकेतन अवसरी खुर्द यांच्या एकत्रीत सभाग्रह ईमारतीचा भूमिपूजन समारंभ दि.५/०९/२०२१ रोजी मा श्री. शरदचंद्रजी पवार (राज्यसभा सदस्य तथा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ) याच्या शुभहस्ते पार पडला .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.ना.श्री दिलीपराव वळसे पाटील (गृहमंत्री ,महाराष्ट्र राज्य )यांनी भूषविले . उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे मा.ना.श्री .बाळासाहेब थोरात (महसूल मंत्री) ,मा.ना .उदयजी सामंत ,(उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ), मा.ना.श्री .बाळासाहेब पाटील (सहकार मंत्री ),मा.ना. श्री प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण ) उपस्थित होते .तसेच मा श्री .संजय राउत ( खासदार तथा राज्यसभा सदस्य ) ,मा श्री.अतुल बेनके (आमदार जुन्नर तालुका),मा श्री .शिवाजीराव आढळराव पाटील (माजी खासदार शिरूर लोकसभा मतदार संघ) यांची विशेष उपस्थिती होती

तसेच मा. श्री .सदाशिव साळुंखे (मुख्य अभियंता ,सा.बा.प्रादेशिक विभाग पुणे) ,डॉ अभय वाघ संचालक तंत्र शिक्षण संचालनालय ) ,मा. डॉ .दत्तात्रय जाधव (सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय पुणे),मा श्री देवेंद्र शहा,(शरद सहकारी बँक मंचर )मा श्री .देवदत्त निकम ( सभापती कृषी उत्पन्न बाजार सामीती मंचर) ,मा. श्री. बाळासाहेब बेंडे ( चेअरमन भीमाशंकर सहकारी कारखाना ) मा. श्री विष्णू काका हिंगे पा.(चेअरमन पुणे जिल्हा दुध उत्पादक संघ ),मा श्री विवेक वळसे पाटील (माजी उपाध्यक्ष ,जिल्हा परिषद पुणे ) ,मा.श्री संजय गवारी सभापती पंचायत समिती आंबेगाव ,मा श्री अरुणाताई थोरात(सदस्या जिल्हा परिषद पुणे) , मा. श्री संतोष भोर (उपसभापती पंचायत समिती आंबेगाव ) ,मा. श्री भगवानराव वाघ ,मा.श्री भगवान शीनालकर ,मा. श्री जगदीश अभंग (सरपंच अवसरी खुर्द ) ,मा सौ स्नेहा टेमकर(सरपंच अवसरी खुर्द ) डॉ.दिलीप नंदनवार (प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन ,अवसरी खुर्द) व प्रा.श्री श्रीधर जोशी (प्र.प्राचार्य शा.अ.व.सं.म.अ.) ऊपस्थित होते.

विस्तारीत ईमारतीच्या बांधकामाकरिता एकून रु.३६६३ .६७ लक्ष रकमेच्या अंदाजपत्रकास शासनाद्वारे मान्यता देण्यात आली होती ,त्यानुसार बांधकाम पूर्ण झाले आहे.सदरील ईमारतीचा वापर स्थापत्य ,संगणक ,उपकरणीकरण ,यंत्र आणी स्वयंचल अभियांत्रिकी विभागाकरीता होईल.

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्र निकेतन अवसरी खुर्द यांच्या एकत्रीत सभागृह बांधकामाकरिता रु १४९५.७२ लक्ष खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे ,प्रस्तावित सभागृहाचे क्षेत्रफळ साधारण ३००० चौमी असेल तसेच सभाग्रहाची बेठक व्यवस्था १०२३ एवढी असेल .सदर सभागृह ईमारतीचा उपयोग प्रामुख्याने दोन्ही संस्थेतील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम तसेच अन्य शैक्षणीक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केला जाईल.

डॉ अभय वाघ संचालक तंत्र शिक्षण संचालनालय यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले व यामध्ये त्यांनी सांगितले की २००८ साली स्थापन झालेल्या ज्ञानरूपी वेलाचे आता ज्ञानरूपी वृक्षात रुपांतर झाले आहे,यावेळी त्यानी ,आतापर्यंत शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयात निर्माण झालेल्या ईमारती ,वस्तीग्रह, क्वार्टर सुविधांबद्दल तसेच विद्यार्थी प्रवेश क्षमता ,एकून शिकत असलेले विद्यार्थी याबाबत माहिती सांगीतली.

मा श्री. शरदचंद्रजी पवार (राज्यसभा सदस्य तथा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ) म्हणाले की ,आज या ठिकाणी आल्यावर वळसे पाटील यांच्या माध्यमातून शैक्षणिक संकुल उभे राहिले याचे समाधान वाटले . उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून दिलीप वळसे -पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले .त्यांच्या माध्यमातून अवसरी खुर्द या ग्रामीण भागात उभे राहिलेले शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय ही कामे दिशादर्शक आहेत . उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील शैक्षणिक संकुला चा फायदा होईल.हा परिसर पाहिल्यावर शेतीला शैक्षणिक जोड मिळणार आहे .भीमाशंकर कारखान्या मुळे शेतीचे अर्थकारण सुधारले .येथील परिसरात १६ लाख लीटर दुधाचे उत्पादन होते , शेतीसोबतच दुग्धव्यवसायातील प्रगतीही चांगली आहे.सरकार मध्ये असो किवा नसो मतदार संघात योजना व निधी कशा पद्धतीने आणयचा हे वळसे पाटील यांच्याकडून शिकून घेण्यासारखे आहे असे त्यांनी नमूद केले .

गृहमंत्री मा.ना. दिलीप वळसे पाटील म्हणाले, अवसरी येथील लोकांनी दिलेली शक्ती जनतेसाठी वापरली याचा फायदा पॉलिटेक्निक इंजिनियरिंग कॉलेज तसेच इतर कार्यक्रमांसाठीही होणार आहे. येथे शासकीय निधी उपलब्ध होण्यासाठी मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, मा.उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी संपूर्ण सहकार्य केले आहे.विस्तारीत इमारतीच्या कामासाठी ३६ कोटी रुपये खर्च झाला शैक्षणिक संकुल राज्यातील विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे ठरणार आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत म्हणाले,की उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झाल्यावर विभागाचा आढावा न घेता श्री वळसे पाटील यांनी हा कारभार कसा चालवला ,याबाबतचा आढावा घेवून त्या माध्यमातून मी काम करण्याची मी प्रेरणा घेतली . त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवसरी येथे बनविलेले अभियांत्रिकी महाविद्यालया सारखेच महाविद्यालय रत्नागिरी येथे उभे करणार आहे. राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभाग देशातील एक आदर्श विभाग म्हणून ओळखला जाईल. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक चांगले काम करून या विभागाला आणखी उंचीवर नेणार असल्याचे सांगून अवसरी येथे झालेल्या शैक्षणिक सोईसुविधेबाबत त्यांनी कौतुक केले.

मा. खासदार श्री. संजय राऊत म्हणाले, अवसरी सारख्या ग्रामीण भागात शैक्षणिक नंदनवन फुलले आहे.या संकुलातुन तयार होणारे हजारो विद्यार्थी राज्य व देशाच्या स्तरावर जातील व अवसरीचे नाव पुढे नेतील.उच्च व तंत्र शिक्षणाचा अवसरी पॅटर्न कोकणात राबविला जाईल.या प्रसंगी माजी खासदार शीवाजीराव आढळराव पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले .

सदरील कार्यक्रम शिक्षक दिनाच्या दिवशी संपन्न झाला. शैक्षनिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्राथमिक ,माध्यमिक शिक्षकांचा तसेच प्र .प्राचार्य प्रा.श्री श्रीधर जोशी ,प्राचार्य डॉ.दिलीप नंदनवार यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला . श्रीमती पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले . प्र .प्राचार्य श्री एस .व्ही जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.