#
News & Events

दिनांक २१ जून २०१८ रोजी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). येथे चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने पार पडला.सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी श्री.रवींद्र प्रभाकर सांडभोर, एम.ए.,(योग शास्त्र व निसर्गोपचार,कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ), संस्थापक मनशक्ती योग आणि मेडीटेशन सेंटर,राजगुरुनगर,पुणे हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.ए.एस.पंत यांनी भुषविले व आजकालच्या धकाधकीच्या जीवनात योगाचे महत्त्व समजावून सांगितले.महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.ए.एस.पंत यांनी मान्यवरांना पुस्तक भेट देऊन सत्कार केला.कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयातील विद्यार्थीनी कुमारी दीप्ती पवार हिने केली. श्री.रवींद्र प्रभाकर सांडभोर यांनी सुरवातीला ‘योगाचे महत्व’ या विषयावर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले, व सर्व उपस्थितांना योगाचे धडे दिले. सर्व उपस्थितांनी योग प्रात्यक्षिके उत्साहाने केली. सदरील कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदविला.तसेच ज्येष्ठ नागरीक म्हणून श्री.सयाजी शिंदे हे उपस्थित होते व त्यांनी उत्स्फूर्तपणे योग प्रात्याक्षिके करून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाचे नियोजन डॉ.एन.पी.फुटाणे, प्र.जिमखाना अधिकारी,तसेच श्री. एस.डी.पाटील,सहा. प्राध्यापक स्वयंचल अभि., श्री. एस.बी.थोरात, तांत्रिक प्रयो. सहाय्यक स्वयंचल विभाग,श्रीमती एस.बी.मोरडे, तांत्रिक प्रयो. सहाय्यक, अणुविद्युत विभाग यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन महाविद्यालयातील श्री. एस.डी.पाटील यांनी केले. तसेच विद्यार्थांमध्ये कु. ललित चौधरी व कु. हीना मुलानी व अधिकारी/ कर्मचारी वर्गात श्री.ए.एस.माने, सहा. प्राध्यापक (अणुविद्युत विभाग) व श्रीमती.वाय.एन.चौधरी सहा. प्राध्यापक (उपयोजित विभाग) यांनी योगाचे उत्कृष्ट प्रात्याक्षिके केल्याबद्दल त्यांना पारितोषिक देण्यात आले. सदरील कार्याक्रमचे निवडक फोटो आहवालासोबत जोडत आहे.