#
News & Events

अवसरी खुर्द : (ता. आंबेगाव) येथे शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनी ,महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी दिनाक 19-01-2019 (शनिवार) रोजी महाविद्यालयात ‘’ओळख स्वतः शी’ ’हा कार्यक्रम घेण्यात आला

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सुषमा अ. कुलकर्णी, एम.डी, (आनंद हास्पिटल नारायणगाव) यांनी आरोग्य व आहार या विषयावर महिला अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले व त्यांच्या सोबत चर्चा केली. या वेळी त्या म्हण्याल्या “ विद्यार्थीनीनीचे हिमोग्लोबिन १३ ते १६ या मध्ये असलेच पाहिजे त्या साठी लोह युक्त खाद्य पदार्थ अवश्य खा.रोज व्याय्याम केलाच पाहिजे आणि आहारात प्रोटीन चा समावेश आवश्यक आहे.” विद्यार्थीनीनी पण त्यांच्या मनातले विविध प्रश्न विचारले व आपल्या शंकांचं निरसन केले . कार्यक्रम श्रीमती एच.एच. राक्षे (महिला समिती अध्यक्षा) व श्रीमती के. व्ही. ठाकूर (कुलमंत्री मुलींचे वसतिगृह) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी, महिला समिती सदस्य श्रीमती वाय.एन.चौधरी व श्रीमती एन.एल पाटील महिला अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

श्रीमती एच.एच. राक्षे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन विनिता भनसाळी व ऋतुजा जावळे यांनी केले.