#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व स्वागताकरीता दि. १/८/२०१७ रोजी पालक व विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने झाले . यावेळी ते म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी चांगला माणूस बनावे, उच्चतांत्रिक समस्या सोडवणारे व जगाला भेडसावणारे गंभीर प्रश्न त्यांच्या तांत्रिक क्षमतेने सोडवावेत ,त्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून घेतले पाहिजे ,तसेच त्यांच्यात उत्तम सवांद कौशल्य असणे ही काळाची गरज आहे असे सांगितले. तसेच त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा पुरविल्या जातात, याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी सर्व विभागप्रमुखांनी शाखानिहाय महाविद्यालयातील प्रत्येक शाखेचे महत्व विषद करून प्रत्येक शाखेकरीता महाविद्यालयात असलेल्या सुविधाबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुलांनी महाविद्यालयात व महाविद्याल्याबाहेर होणाऱ्या विविध स्पर्धामध्ये भाग घेवून आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व विद्यापीठाकडून येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले. कुलमत्री श्री.टी.टी.वाघमारे व श्रीमती वाय.एन.चौधरी (मुलांचे व मुलींचे वसती गृह) , यांनी वस्तीग्रहाचे नियम व वस्तीग्रहात पुरवण्यात येणाऱ्या सुविधाबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ती सोडवण्यात यईल असे सांगितले. महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी डॉ.एम.जे.पाबळे यांनी अभियांत्रिकीच्या परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांनी कमी वेळेत जास्त अभ्यास कसा करावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. जिमखाना अधिकारी डॉ. एन.पी.फुटाणे यांनी रगिंग प्रतिबंधक कायदे ,मुलांनी घ्यावयाच्या काळजी ,महाविध्यालयाने रगिंग निर्मुलनाकारीता केलेल्या उपाययोजना, तसेच महाविद्यालयात कोणत्याही प्रकारची Raging होणार नाही याबाबत काळजी घेण्यात यईल असे सांगितले. महाविदायलायचे यावर्षी Admission Merit cut-off वाढले आहे.तसेच सदर महाविद्यालयात शासनाद्वारे नव्याने तज्ञ प्राध्यापक रुजू होत आहेत त्यामुळे मुलांना फायदा होणार असून सदरील महाविद्यालय प्रगतीपथावर राहणार आहे. यावेळी सर्व पालक व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी एकूण ४०० विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कार्यक्रमाचे आयोजन उपयोजित विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉ.यु .एस .काकडे व प्रथम वर्ष समन्वयक श्रीमती एच. एच.राक्षे यांनी केले.अतांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक श्रीमती ए.एस.खरात यांची आयोजनासाठी मदत केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेशी राठोड व सिद्धिका कापुरे यांनी केले.