#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथे वन महोत्सव उत्साहात साजरा

.

महाराष्ट्र शासनाने दिनांक ०१ जुलै २०१७ रोजी वन महोत्सव साजरा करण्याचे ठरिवले होते. त्याकरिता शासनाने ४ कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला होता, त्या अनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी या महाविद्यालयाने दिनांक ०१ जुलै २०१७ रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. महाविद्यालय परिसर निसर्ग रम्य आहे, तसेच या वृक्ष लागवडीमुळे  महाविद्यालयाचे नंदनवन होणार आहे असे प्रतिपादन मा. प्राचार्य यांनी केले. तसेच संस्थेतील अधिकारी , कर्मचारी व   विदयार्थी यांनी सदरील लावेलेल्या वृक्षांची जोपासना होण्याकरिता वृक्ष दत्तक घ्यावेत असे आव्हान मा. प्राचार्य यांनी केले .सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विदयार्थी यांनी वृक्षारोपण करून  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर सोहळ्यामध्ये शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये चिंच, आवळा, गुलमोहर, रेन ट्री, सीताफळ अशा  विविध झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील जिमखाना, ग्रीन क्लब, आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांनी संयुक्तपणे केले होते. कार्यक्रमाचे नियोजन प्र.जिमखाना अधिकारी डॉ.एन.पी.फुटाणे व सहा. प्राध्यापक स्वयंचल अभियांत्रिकी  श्री. एस.डी.पाटील व श्री. डी. एस. लेंगरे,तांत्रिक प्रयोगशाळा  सहाय्यक श्री. एस.बी.थोरात, श्री. ओ. ए. राऊत व श्रीमती एस.बी.मोरडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयीन विद्यार्थी कुमार स्वपनिल लोणकर याने केले.