#
News & Events

सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजीनीअर्स इंडिया (एस.ए.ई ) दक्षिण विभागामार्फत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर डिझाईन स्पर्धेमध्ये शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी (खुर्द) येथील टीम कर्षयण च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक पटकाविला आहे व रु ६०००० (साठ हजार रुपये) रोख बक्षिस व पारितोषिक मिळवले आहे. ही स्पर्धा श्री रामास्वामी मेमोरियल विद्यापीठ (SRM University), चेन्नई येथे दि. २१ ते २३ जून २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धेत भारतातील एकूण ३० महाविद्यालयाच्या संघानी सहभाग घेतला होता. त्यांपैकी १८ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेत ड्यूरयाबिलीटी टेस्ट, ब्रेक टेस्ट, म्यान्यूवर्याबीलीटी टेस्ट इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व स्पर्धांमध्ये टीम कर्षयण ने अव्वल कामगिरी दाखविली. टीम कर्षयण ने तयार केलेल्या ट्रॅक्टरचे वजन ७१० किलो आहे व त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता २ टन इतकी आहे. या ट्रॅक्टरची लांबी २४५० मी.मी. व रुंदी १२१० मी.मी. आहे. या ट्रॅक्टरचा कमाल वेग ताशी २५ किमी. आहे. तसेच विद्यार्थ्यांनी सदर ट्रॅक्टरमध्ये लोड सेल, न्यूट्रल स्वीच या सारख्या अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ट्रॅक्टरला बनवण्याकारीता रु. ३२०००० (तीन लाख वीस हजार) खर्च आला आहे.

सदर टीम कर्षयण मध्ये अमोल दुनबळे (संघ प्रमुख), स्वप्नील पवार, आनंद मसणकर, प्रांजल पाटील, मनीष बारस्कर, गणेश पारस्कर, सागर जाधव, कैलाश चव्हाण, पंकज माढेकर, संकेत गायकवाड, भावेश इंगळे, सुजित इंगळे, अनुप तिवारी, मयूर राउत, मुकुल केदार, रुचिता कुंभारे, सुरभी खपले, किरण थोरात, कैफइक़्बल शेख, पूजा शिंदे, सचिन तिवारी, स्नेहल बाबर, निवेदिता मेनन, कौस्तुभ संकपाळ, व अनुजा साकोरे इत्यादी स्वयंचल व यंत्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या मेह्नतीने सदरील ट्रॅक्टर तयार केला व स्पर्धेत सहभाग नोंदवला.

सदर संघाला प्रा. रवी काकडे (शिक्षक सल्लागार), स्वयंचल विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिलीप पानगव्हाणे, यंत्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. श्रीधर जोशी, यांचे संघाला मार्गदर्शन, प्रोत्साहन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांनी टीम कर्षयण चे अभिनंदन केले आहे तसेच सदरील टीम ने पहिल्याच प्रयत्नात लाक्षणिक यश संपादित केले आहे असे सांगितले.