#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयतिल विद्यार्थ्यानी तयार केलेल्या सोलर कारने नॅशनल सोलर कार चैंपियनशिप स्पर्धेत सहभाग घेतला होता . देशातील 40 अभियांत्रिकी महाविद्यहलायतिल संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. गुजरात येथील मोटरस्पोर्ट तर्फे नॅशनल सोलर कार चैंपियनशिप(NSVC) सिज़न दोन रेसिंग स्पर्धा 18 ते 22 मार्च २०१८ या दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. अवसारीच्या विद्यार्थ्यांची हेलिएस ही टीम होती . विद्यार्थ्यानी खूप परिश्रम घेऊन सौरऊर्जेवर चालणारी कार बनवली.या विद्यार्थ्यांच्या कष्टाला फळ मिळाले आणि त्यांना 'टीम स्पिरिट' असे परितोषिक व पाच हजार रुपयाचा धनादेश मिळाला .ही कार पर्यावरणाला खूप पूरक आहे.यामुळे इंधनाचा वापर कमी केला जाईल आणि कधी न संपणाऱ्या सुर्यासारख्या स्त्रोताचा चांगला वापर होईल असा विचार करून या विद्यार्थ्यानी सोलर कार तयार केली.

या संघात द्वितीय आणि तृतीय वर्षमधील यंत्रविभाग,अनुविदयुत अणि दूरसंचार विभाग,स्वयंचालित विभागातील 35 विदयार्थ्याचा समावेश आहे. नीरज वाणी हा या संघाचा संघप्रमुख असून त्यात शुभम अरगड़े, आकाश पाटील,वैभम बावीसकर, सुरज खेड़कर,प्रतिक सुतार, सुरज गायकवाड़,अंकित इंगले,रोहन सोनवणे,रितेश उतेकर ,सागर नारखेड़े, प्राजक्ता जाधव,प्रतिज्ञा कणसे, दीप्ती पवार,सायली मस्के, पूजा काटकर,शुभम मेहर, स्नेहल वखारे, गायत्री हांडगे, सर्वदा कुंभार, गणेश बागल, स्वप्निल गाडगे, सायली कांगने, भास्कर पाटील ,हीना मुलानी, संदेश खैरनार, प्रज्वल राठौड़, जयराज बिटके, कविता शर्मा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

प्राचार्य डॉ.अविनाश पंत यांनी सांगितले की सद्यस्थितीत जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्याप्रमाणात उर्जेची गरज वाढत आहे. सौर ऊर्जा स्त्रोत हे निसर्गाला कोणतीही हानी पोहचवत नाही. सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारच्या वापरामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होईल. अवसरीच्या विद्यार्थ्यानी या चैंपियनशिप मध्ये पहिल्यांदाच भाग घेतला असून पहिल्याच प्रयत्नात भरपूर यश मिळवले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पंत प्रा.एस.व्ही.जोशी,डॉ.एम.एस.नागमोडे, डॉ.एस.व्ही.करमारे ,प्रा. ए.एस. कौशल यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन मिळाले