#
News & Events

 भाऊ इन्स्टीटयूट ऑफ इनोव्हेशन इंटरप्रिनीअरशिप आणी लीडरशिप व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे यांच्या सयुक्त विदयमानाने आयोजित “इग्नाईटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडिया टेक्नो सोशीयल प्रोजेक्ट २०१८-१९ ” या राज्यस्तरीय स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. 

ही स्पर्धा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञानातील ज्ञान समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देते. त्यामुळे या स्पर्धेतून विद्यार्थ्यांची विविध कौशल्य विकसित होत जातात. राज्यातील विविध महाविद्यालयातील ११२५ संघांमधून शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील दोन संघांनी यश मिळविले. या स्पर्धेत महाविद्यालयातील ३१ संघांनी सहभाग नोंदवला होता.त्यामधील ४ संघ हे अंतिम फेरीत दाखल झाले होते , अशी माहिती आउट साईड अम्बसीडर शुभम थावरे (अंतिम वर्ष उपकरणीकरण ) याने सांगीतली  

त्यामध्ये ‘ स्मार्ट पेस्टीसाइड स्प्रेअर’ या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघातील रोहोनी मुंघाटे ,शुभम थावरे, शुभम कुऱ्हे , अनिकेत निकम, व्यंकटेश पाटील व बिंदिया मेहता यांनी ६ महिने मेहनत करून शेतकरयांना उपयोगी असे फवारणी यंत्र विकसित केले.हात पंप न हलवता फक्त पायी चालून शेतकरी फवारणी करू शकतो . या यंत्रामुळे शेतकरी थकणार नाही व फवारणी करणे सुलभ होणार आहे.
तसेच ‘कनेक्ट असिस्टंट या संघाने उद्योजकता विभागात दुसरा क्रमांक पटकवला. या संघातील गोविंद डागा, अभिषेक वाडमारे, अनुराग मिश्रा, कॉनेन सईद व हर्षद मेश्राम यांनी कोन्सलिंग अॅप बनविले.या अॅप द्वारे विद्यार्थ्यांना करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन,तसेच विविध क्षेत्रात काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा तणाव कमी करण्याकरीता उपयोग होणार आहे  
दोन्ही संघाच्या यशामध्ये ईटन पुणे कंपनीचे अभियंता श्री अशोक शिंदे, श्री .अभिजित गुंडावर यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ.शि.पंत यांचे प्रोत्साहन विद्यार्थ्यांना लाभले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश पंत व सर्व विभागप्रमुखांनी यांनी स्पर्धेत यश संपादित कलेल्या विदायार्थ्यांचे अभिनंदन केले.