#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभ

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी (खुर्द) येथे शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील चतुर्थ वर्षातील अणुविदुयत, उपकरणीकरण, यंत्र, स्वयंचल, स्थापत्य, आणि संगणक अभियांत्रिकीविद्यार्थ्यांसाठी दि. १५/०५/२०१८ रोजी निरोप समारंभ आयोजित केला होता. सदर समारंभाची सुरुवात मा. प्राचार्य डॉ. अ. शि. पंत यांचे हस्ते दिप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस तृतीय वर्षअभियांत्रिकीच्या मनीष बारसकर, चिन्मय पाटील अनिकेत, वैष्णव यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी सर्व विभागांच्या विभाग प्रमुखांनी व जिमखाना प्रमुखांनीविद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व मोलाचे मार्गदर्शन केले. चतुर्थ वर्षातीलविद्यार्थ्यांनी आठवण म्हणून त्यांच्या चार वर्षाच्या कालावधीतील आठवणींना उजाळा देत नाविन्यपूर्ण videoक्लिप तयार करून सादर केली. विद्यार्थ्यांनीचार वर्षातील अनुभव व सुधारणांच्या अपेक्षा व्यक्त केल्या. शेवटी मा. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्य व कारकीर्द या बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिमखाना विभागातर्फे करण्यात आले होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यास श्री. एस. बी. थोरात व श्रीमती एस. बी. मोरडे, निदेशक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.