#
News & Events

२९ सप्टेंबर २०१६ रोजी उरी हल्ल्याच्या 11 दिवसानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानी प्रशासित कश्मीरमध्ये संशयित दहशतवाद्यांविरुद्ध "शस्त्रक्रिया" केली होती. या करता दिनांक २९ सप्टेंबर २०१८ रोजी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). मध्ये “शौर्य दिन” मोठ्या उत्साहाने पार पडला.यातून मुलांना प्रेरणा मिळावी हा उद्देश होता .

सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी तसेच विदयार्थी मोठ्या संख्येनेउपस्थित होते. सदरील कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका माजी सैनिक अध्यक्ष श्री. विलास अभंग, माजी नायक- थलसेना, तसेच श्री. नानजी कोरडे, माजी हवलादार- थलसेना, श्री. संभाजी सिनलकर, माजी सार्जंट- नौसेना, श्री.डी. बी. गिंडे, माजी सुभेदार- थलसेना, श्री. यशवंत गांजाळे माजी हवालदार- थलसेना, दिलीप आरोटे माजी सार्जंट- वायुसेना, रामदास मेहेर, माजी नायब सुभेदार –वायुसेना व श्री. भरत विश्यासराव, माजी लान्स नायक- थलसेना हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.ए.एस.पंत यांनी भुषविले. श्री. नानजी कोरडे, माजी हवलादार- थलसेना यांनी सैन्यात कार्यरत असताना बजावलेल्या कामगिरी बाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांचा पोखरण चाचणी मधील रोमांचित अनुभव सागंताना ते हरपून गेले. त्यांनी २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्याने कशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले याचे दुश्य डोळ्यासमोर उभे केले. त्यांचे मनोगत ऐकताना विधार्थी भारावून गेले होते. तसेच श्री. संभाजी सिनलकर, माझी सार्जंट- नौसेना, श्री.डी. बी. गिंडे, माझी सुभेदार- थलसेना यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले व विदयार्थीना उपदेश केले.सर्वांनी सैन्यातील त्यांच्या चित्तथरारक आठवणीना उजाळा दिला महाविद्यालयाचे प्राचार्य मा. अ. शि. पंत यांनी सर्व पाहुण्यांचे सदर कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यत केले.

कार्यक्रमाचे नियोजन डॉ.एन.पी.फुटाणे, प्र.जिमखाना अधिकारी,तसेच श्री. एस.डी.पाटील,सहा. प्राध्यापक स्वयंचल अभि., श्री. एस.बी.थोरात, तांत्रिक प्रयो. सहाय्यक, स्वयंचल विभाग,श्रीमती एस.बी.मोरडे, तांत्रिक प्रयो. सहाय्यक, अणुविद्युत विभाग यांनी केले.