#
News & Events

"भारतीय नौसेना मध्ये नोकरीच्या संधी बाबत व्याख्यान " .

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी खुर्द येथे प्रशिक्षण व आस्थापना विभागातर्फे अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौसेना यामध्ये नोकरीच्या संधी या विषयावर दिनांक ३०-०६-२०१७ रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. ए. एस. पंत यांनी केले. कॅप्टन जे. के. चौधरी, Command Recruitment Officer, Western Naval Command, Mumbai यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय नौसेना याचे विशेष कार्य, विशेष महत्व, नौसेनेमधील वेगळे विभाग, नौसेनेमधील उपलब्ध सेवेच्या संधी व सुविधा, या विषयांवर कॅप्टन जे. के. चौधरी, यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. बी. ए. पाटील, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, यांनी केले. व्याख्यानाचा एकूण १७४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला