#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात  “राष्ट्रीय क्रिडा दिवस”  तसेच “फीट इंडिया मुहुमेंट” चे आयोजन

दिनांक २९ ऑगस्ट २०१९ रोजी शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). येथे राष्ट्रीय क्रिडा दिवस तसेच फीट इंडिया मुहुमेंट च्या उदघाट्नच्या अनुषंगाने मॅरॅथॉन व फिटनेस च्यालेंज या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

मॅरॅथॉन (धावण्याची शर्यत) कार्यक्रमाचे उदघाट्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. शि. पंत यांनी केले. त्यावेळी त्यांनी सर्वांना खेळाचे महत्व पटवून दिले तसेच आपण दिवसातून सकाळी फक्त एक तास व्यायाम करिता दिला असता आपण नेहमी निरोगी राहू शकतो असे ते म्हणाले, तसेच त्यांनी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीनी सुरू केलेल्या “ फीट इंडिया मुहुमेंट” बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. मॅरॅथॉन स्पर्धा शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय,अवसरी(खु). ते मंचर दरम्यान सदर घेण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना महाविद्यालयातील विद्यार्थी यशोधन चव्हाण याने केली.

तसेच महाविद्यालयात अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना फिटनेस च्यालेंज देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यात दोरीवरील उड्या, दंड काढणे अशा विविध क्रीयांचा समावेश होता.

मॅरॅथॉन स्पर्धेत गणेश मोरे व मदुरा हांडेदेशमुख (प्रथम वर्ष उपकरणीकरण) यांनी विजय संपादित केला दोरीवरील उड्या फिटनेस च्यालेंज स्पर्धेत श्री प्रतीक व्हावळ (प्रयोगशाळा परिचर),श्रीमती अंकिता कहाणे,श्री अनिल राठोड (निदेशक) यांनी यश संपादित केले .

कार्यक्रमाचे नियोजन डॉ.एन.पी.फुटाणे, प्र.जिमखाना अधिकारी,तसेच श्री. एस.डी.पाटील,सहा. प्राध्यापक स्वयंचल अभि.,श्रीमती एस.बी.मोरडे यांनी केले. सदर कार्यक्रमांसाठी विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. यश संपादीत केलेल्या विद्यार्थ्यांचे व कर्मचाऱ्यांचे प्राचार्य डॉ. अ. शि. पंत यांनी अभिंनंदन केले .