#
News & Events

"मराठी भाषा गौरव दिवस" .

दिनांक २७/०२/२०१७ रोजी महाविद्यालयामध्ये ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.संतोष पवार, प्राध्यापक,मराठी भाषा विभाग, आण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ.अ.शि.पंत,आलेले प्रमुख पाहुणे व जिमखाना अधिकारी यांनी सरस्वती प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन केले, तसेच ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुष्प अर्पण केले. सदरील कार्यक्रमादरम्यान प्रा.संतोष पवार, यांनी उपस्थितांना मराठी भाषेबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्राचीन काळातील मराठी भाषेची उत्पत्ती, तीचा विकास याबद्दल अधिक माहिती दिली. तसेच कार्यक्रमादरम्यान स्वरचित कवितांचे वाचन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले, मा.प्राचार्यांनी मराठी भाषेचा दैनंदिन जीवनातील वापर, तीचे महत्व अधोरेखित करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमामध्ये श्री. ए. एफ. इनामदार, मा. राष्ट्रपती हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक यांच्या मुलाखतीचे सादरीकरण करण्यात आले. "मराठी भाषा गौरव दिन" या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, कविता व कथा वाचन स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सदरील स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ठ स्पर्धकांना डॉ. कलामांचे ‘अग्निपंख’ हे पुस्तक बक्षिस म्हणून भेट देण्यात आले. सदरील कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे मा.प्राचार्य, अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणावर विदयार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्री. डी. जे. परेरा, प्र. जिमखाना अधिकारी यांनी केले.


श्री. ए. एफ. इनामदार यांची मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा