#
News & Events

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीने विद्यार्थिनी ,महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या व्याख्यानात कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, प्रतिबंध, आणि निवारण) अधिनियम 2013 या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व इनर व्हील क्लब मंचर यांच्या सयुक्त विदयमाने घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.पंत यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. इनर व्हील क्लब मंचर अध्यक्ष डॉ. मधुरा शेट्टे व क्लब सदस्य ,निवारण समिती सदस्य श्रीमती वाय.एन चौधरी ,श्रीमती एन.एल. पाटील माजी निवारण समिती प्रमुख डॉ के.व्ही. ठाकूर उपस्थित होते. व्याख्यानाचा उद्देश काय आहे हे डॉ. मधुरा शेट्टे यांनी सांगितले. वकील श्रीमती संध्या बाणखेले यांचा परिचय डॉ.सुचेता शेट्टे इनर व्हील क्लब मंचर सदस्य यांनी केला.

वकील श्रीमती संध्या बाणखेले यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, प्रतिबंध, आणि निवारण) अधिनियम 2013 या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थिनीनी चांगला प्रतिसाद दिला. श्रीमती संध्या बाणखेले म्हण्याला कि अधिनियम 2013 हा महिलांबाबत होणाऱ्या लैंगिक छळवणूक बद्दल आहे . लैंगिक छळवणूक म्हणजे नक्की काय ? या बद्दल खुलासा केला. यावेळी एकूण ११० विद्यार्थिनी ,महिला अधिकारी व कर्मचारीविधा उपस्थित होते. महाविद्यालयाच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष श्रीमती एच.एच. राक्षे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्र संचालन व आभार प्रदर्शन विनिता भनसाळी व विद्या नरके यांनी केले.