#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन २०१८-१९(RESONANCE 2K19) उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस.पंत यांच्या हस्ते ११/०१/२०१९ रोजी झाले.सर्व प्रकारचे सांस्कुतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.पारितोषिक वितरण कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मराठी चित्रपट अभिनेता श्री संजय खापरे हे लाभले .पारितोषिक कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्री संजय खापरे म्हणाले की,”माणसाने पहिले माणूस म्हणून जगण्यास शिकले पाहिजे,तसेच अभिनय करताना आपणास नेमून दिलेल्या पात्रात बांधून घ्यावे लागते व कठोर म्हेनत घ्यावी लागते”. त्यांनी गायलेल्या गाण्यांना तसेच त्यांच्या विविध चित्रपटातील अभिनयाला विदयार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला .महाविद्यालयात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे एकपात्री अभिनय - सुमित दांगट,एकांकिका - प्रतिक शिंदे संकेत कर्जुले, आंतरविभागीय सादरीकरण – उपकरणीकरण विभाग, उत्कृष्ठ अभिनय पुरस्कार -अक्षय मुळे ,कविता सादरीकरन-प्रमोद परदेशी,गायन –स्नेहा नागरे, सोलो नृत्य- अश्विनी लोमटे, समुह नृत्य- प्रियांका पवार व गायत्री हांडगे, सर्वोत्तम दिग्दर्शक व सूत्रसंचालन - अनुजा देशपांडे

वार्षिक स्नेहसंमेलन २०१८-१९(RESONANCE 2K19)अंतर्गत महाविद्यालयामध्ये दि.०५/०१/२०१९ रोजी कॉम्बट २०१९ (COMBAT 2K1९) या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन प्रमुख अतिथी मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) सोमनाथ पांचाळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. स्पर्धांमध्ये विजेत्यांची (मुली व मुले ) अनुक्रमे नावे खालीलप्रमाणे त्यामध्ये कॅरम - वृषाली वणवे व दीपक रणदिवे, १०० मी धावणे - निकिता वाघमोडे व रोहन देशमुख, टेबल टेनीस- सोफिया शेख, अक्षय ननावरे, बॅडमिंटन - -वैष्णवी खोब्रागडे, सुमित माने, बास्केट बॉल- हर्षल पोहरे, चेस अपूर्वा दाभाडे, रोहन विधाटे ,खो-खो प्रियांका अंकुश,विशाल कासार, हॉली बॉल स्नेहल पांचाळ, श्रीनाथ साळुंके, फुटबॉल - हर्षल पोहरे संघ , कब्बडी सुस्मिता पवार संघ व ओमकार सुतार संघ , बॉक्स क्रिकेट -एश्वर्या पाटील व अनिकेत थोरात संघ , लॉंग क्रिकेट –तन्मयी बोऱ्हाडे हे विद्यार्थी विजयी झाले.

विविध स्पर्धामध्ये यश संपादित केलेल्या विदयार्थ्यांचे प्राचार्य डॉ. ए.एस.पंत यांनी अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. ए.एस.पंत यांनी सांगितले की महावीदयालयातील विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून वीद्यार्थ्यानी रोबोकॉन ,ईयंत्र, हॅकॅथॉन,ट्रक्टर डीझाईन, अशा विविध तांत्रिक स्पर्धामध्ये सुद्धा मोठे यश संपादित केले आहे. यावेळी जिमखाना प्रमुख श्री एस.डी.पाटील यांनी वर्ष २०१८-१९ चा जिमखाना अहवाल सादर केला .सांस्कृतिक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वैष्णव वीरकर याने काम पहिले.सूत्रसंचलनाचे काम निकिता कदम व स्वप्नील लोणकर यांनी पहिले. स्नेहसंमेलन समन्वयक म्हणून डॉ. बोनगुलवार व डॉ. देऊळकर यांनी काम पाहिले.