#
News & Events
शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात इ-यंत्र (e-yantra) लॅबचे उद्घाटन

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरी येथे दि.२८/२/२०१८ रोजी आय.आय.टी.मुंबई मार्फत विज्ञान दिनाचे औचित्य साधून इ-यंत्र (e-yantra) लॅबचे उद्घाटन देशातील सात महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने video conferncing द्वारे करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी भाषणात प्राचार्य डॉ.ए.एस.पंत म्हणाले की, “सद्यस्थितीत रोबोटिक्सची मागणी पाहता सदरील लॅबचा उपयोग विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर करून घ्यावा, त्यामुळे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील .”

इ-यंत्र (e-yantra) लॅब ही आय.आय.टी.मुंबई समर्थित असून तिला नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन अंतर्गत एमएचआरडी द्वारे निधी उपलब्ध झाला आहे . लॅब संस्थेत स्थापन करण्याकरिता संस्थेतील चार प्राध्यापकांनी आय.आय.टी.मुंबई मार्फत आयोजित तीन महिन्यांचे प्रशिक्षण चांगले पूर्ण केल्याबद्दल आय.आय.टी.मुंबई द्वारा चार हजार रुपयांचा रोख पुरस्कार संबधित टीमला मिळाला आहे. महाविध्यालयाच्या वतीने लॅबकरीता लागणारे दोन लाखांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. सदर लॅब आय.आय.टी यांच्या मार्गदर्शनाखाली असल्यामुळे आय.आय.टी.मुंबई येथील तज्ञ प्राध्यापकांचा लाभ विद्यार्थ्यांना होईल. इ-यंत्र लॅब अनुवीद्युत विभागात तयार करण्यात आली आहे.या लॅब करीता आय.आय.टी.मुंबई कडून फायर बर्ड -५ या श्रेणीतील तीन रोबोट संस्थेला नि: शुल्क मिळाले. सद्यस्थितीत या प्रयोगशाळेत संस्थेतील ५० विद्यार्थी काम करत आहेत व पुढे जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल.

या लॅब करीता समनव्यक म्हणून डॉ. एन.पी.फुटाणे काम पाहत आहेत व त्यांच्या सोबत सद्यस्य म्हणून, श्रीमती पी.आर देशमुख, श्री. आर.पी.काकडे श्रीमती एन. पी.वाघ काम पाहत आहेत. लॅब उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.ए.एस.पंत, अनुविद्दूत विभागप्रमुख डॉ.एम.एस.नागमोडे, डॉ. एन.पी.फुटाणे, श्रीमती पी.आर देशमुख, श्री. आर.पी.काकडे,श्री जी .आर .फुले ,श्री.ए.एस.माने,श्री एस.के .शिवले ,श्रीमती पी.जे .मोरे ,श्रीमती एस.बी मोरडे व विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .