#
News & Events

कॉलेज ऑफ इंजिनेरिंग पुणे येथे सीओईपी इंप्रेशन (COEP impression) अंतर्गत दि.१५ /१२/२०१८ रोजी पार पडलेल्या सुनो सुनो या पथनाट्य स्पर्धेत शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय अवसरीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे. या स्पर्धेत विविध ठिकाणाहून ५ संघ सहभागी झाले होते. अवसरीच्या वि्द्यार्थ्यांच्या आरक्षण या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. या पथनाट्यात आरक्षण सुरु झाल्यावारतीचे फायदे व नंतर सद्यस्थित आरक्षणाचे फायदे व तोटे तसेच आरक्षण जातीय निहाय न राहता आर्थिक निकषावर असावे असा भर होता.

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण दिग्गज कलाकार श्री. विक्रम गोखले यांच्या हस्ते पार पडले.विद्यार्थ्यांना जिमखाना अधिकारी डॉ. एन.पी फुटाणे,सांस्कृतिक सचिव वैष्णव वीरकर व पथनाट्य समन्वयक सय्यद कौनेन ,ऐश्वर्या मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.