#
News & Events

शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय, अवसरी ( खुर्द ) च्या स्वयंचल अभियांत्रिकीचा बुद्धिबळपटू कु. राठोड सचिन बाबासाहेब याने हैद्राबाद येथे पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. पंच्चाहातर हजार रुपयांची रोख रक्कम व चषक त्याला बक्षिस स्वरुपात मिळाले. तेलंगाना राज्य बुद्धिबळ संघटना आणि फयाज चेस अकँडेमी, हैद्राबाद यांनी संयुक्तरित्या राष्ट्रीय पातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन नुकतेच केले होते.

सदर द्वितीय क्रमांकाचे बक्षिस रु. ७५,०००/- व चषक असे आहे. १३५० गुणांकापेक्षा कमी गुणांक श्रेणी मधील बुद्धिबळ स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. त्याला संस्थेचे प्राचार्य डॉ. पंत ए.एस. आणि स्वयंचल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पानगव्हाणे डी. एस. यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या जिमखाना विभागातील जिमखानाअधिकारी डॉ. फुटाणे एन.पी., श्री पाटील एस. डी., श्री परेरा डी., श्री थोरात एस.बी., श्रीमती मोरडे एस. यांनी प्रोत्साहन व सहाय्य केले. तसेच त्याला श्री खाणकर साईराज यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. या यशाचे कौतुक पंचक्रोशीतून होत आहे.